पान:गृह आरोग्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेळापत्रकाव्यतिरिक्त वेळेत करावयाचे आहे. यासाठी प्रत्येक गटातील एखादा उत्साही, शाळेजवळ राहणारा विद्यार्थी साहाय्यक म्हणून घ्यावा. इतर विद्यार्थ्यांवर निरीक्षणे नोंदण्याची जबाबदारी टाकावी. प्रात्यक्षिक करताना १८ ते ४८ तास अचूक निरीक्षण करण्यास सांगावे. विशेष माहिती: प्रेशर कुकरच्या मदतीने निर्जंतुकीकरण - काही जीवाणू ६० ते ९० अंश सेल्सिअस एवढ्या तपामानातही जिवंत राहू शकतात. प्रेशर कुकरच्या आत १२० अंश सेल्सिअर पर्यंत तापमान वाढवता येते. एवढ्या जास्त तापमानामध्ये एखादी वस्तू २० मिनिटे ठेवल्यास ती निश्चितच पूर्णपणे निर्जंतुक होते. खळखळून वाहणान्या झयाच्या पाण्यात हवा मिसळल्यामुळे संथ वाहणाऱ्या पाण्यापेक्षा खळखळते पाणी जास्त स्वच्छ असते. * जमिनीच्या विविध थरांतून येणाऱ्या पाण्यातील जीवाणू मातीच्या कणांवर चिकटून राहतात. त्यामुळे बोअरवेलमधील पाणी जीवाणूरहित असते. माती गाळून घेतल्यानंतर ते पिण्यास सुरक्षित असते. जरा डोके चालवा : * पाणी पिण्यायोग्य नसते तेव्हा त्यात कोणकोणते हानिकारक घटक असतात? विद्यार्थी कृती : (१) एका माठात कोळसा, वाळू व माती यांचे एकावर एक थर घाला. या थरांतून पाझरलेले पाणी दुसऱ्या भांड्यात गोळा करा. थरांतून पाझरण्यापूर्वीच्या पाण्याचा नमुना व पाझरल्यानंतरच्या पाण्याचा नमुना अशा दोन्ही HOStrip test तपासणी करून पहा. (२) तांबे या धातूच्या भांड्यात ६ तास पाणी साठवा. साठवण्यापूर्वीच्या पाण्याचा नमुना व ६ तास साठवल्यानंतरच्या पाण्याचा नमुना अशी दोन्ही प्रकारच्या नमुन्यांची HO Strip test करून पहा. (३) पाणी तपासणीचा अहवाल संगणकातील Word Processor वापरून तयार करा व छापा.