पान:गृह आरोग्य.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : दहावा प्रात्यक्षिक : पाणी परिक्षण करणे. उद्देश : पाण्याची HO Strip test तपासणी करणे व ते पिण्यायोग्य आहे अथवा नाही याचा अहवाल तयार करणे. अपेक्षित कौशल्ये : (१) पाणी तपासणीसाठी पाण्याचा नमुना घेता येणे. (२) पाण्याचा रंग बदल निरीक्षणा द्वारा समजणे. (३) पाण्यातील हानिकारक जीवाणूंची विद्यार्थ्याला कल्पना असते. (४) तपासणीसाठीच्या साहित्याची हाताळणी करता येते. साहित्य: HoStrip testBottle, पाण्याचा नमुना. दक्षता : (१) एका वेळी एकच टेस्ट सँपल घ्या. (२) पाणी सँपल घेताना स्वच्छ भांड्यात घ्यावे. दोन तीन ठिकाणच्या पाण्याचे मिश्रण करून टेस्ट करू नये. (३) पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचना पाळा. पाणी परिक्षण करताना घड्याळाचा वापर करावा. पाणी तपासणीसाठी HO Strip test Bottle मध्ये पाणी भरल्या नंतर ४८ तासानंतर बॉटल मधील पाण्याचा रंग शेजारील गुलाबीसर दिसतो. कृती : (१) ज्या पाण्याची तपासणी करावयाची आहे त्या पाण्याचा १०० मिली. नमुना (सँपल Sample), निर्जंतुक बाटलीत भरून ठेवा. H,OStrip testबॉटल वरील दिलेल्या रेषेपर्यंत पाण्याचा नमुना भरून घ्या. पाण्याच्या बाटलीचे झाकण पक्के बसवा, हळुहळू बॉटल हलवा त्यामुळे पाण्याची अभिक्रीया बाटलीतील कागदाबरोबर होऊ द्या. (४) टेस्ट बॉटल सभोवतालच्या तापमानाला ३० ते ३७ अंश सेल्सियसला बंद खोलीत किंवा ३७ अंश सेल्सियसला एका ठिकाणी १८ ते ४८ तास ठेवा. निरीक्षण व अनुमान : (१) पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यायोग्य नाही. (२) पाण्याचा रंग पिवळा राहील तर पाणी पिण्यास योग्य आहे असे समजावे. उपक्रमाची निवड करणे : (१) गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर, बोअर, तलाव येथील पाण्याचे नमुने घेऊन पाण्याचे परीक्षण करा. पाणी परीक्षणाचे रिपोर्ट गावातील सरपंचांना देऊन त्यावरील करावयाची प्रक्रिया सांगा. (२) तुमच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या नमुना तपासून त्याचा रिपोर्ट मुख्याध्यापकांना द्या. शिक्षक कृती: * प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी पाण्याचा सँपल स्वच्छ निर्जंतुक बाटलीत आणून ठेवणे हे कामे शालेय ३२