Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहाय्याने सपाट आरसा बसविलेला असतो. या सपाट आरशावर पडलेले सूर्यकिरण पेटीच्या अंतर्भागात परावर्तित होतात. या पेटीमध्ये अन्न शिजविण्यासाठी धातुनलिका किंवा धातुचा डबा ठेवलेला असतो. धातुनलिका / धातुच्या डब्यास बाहेरून काळा रंग दिलेला असतो. आरशावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन आतील भांड्यावर पडावेत आणि ते अन्न लवकर शिजावे यासाठी आरशाचे अनुयोजन केले जाते. भांड्याचा बाह्य पृष्ठभाग काळया रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात १००० ते १४०°C इतके तापमान वाढू शकते. यासाठी हा सौर कुकर किमान दोन तास उन्हामध्ये ठेवावा. या प्रकारचे कुकर मंद उष्मा ऊर्जा वापरून पदार्थ शिजविण्यासाठी केला जातो. उदा. : तांदूळ, पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, बटाटे, अंडी इ. • सोलर कुकरमधील पत्र्याच्या आतील बाजूस ग्लास वुल वापरलेली असते. • काच व त्याखाली चौकोनात गरम हवा बाहेर जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जाड रबर पट्टी लावलेली असते. शिक्षक कृती: (१) सोलर कुकर बद्दल माहिती देणे. (२) सोलर कुकरचा उपयोग कसा करायचा व सोलर कुकरचे पारदर्शक होणारे फायदे व तोटे सांगणे. झाकण (३) एका तासाने सोलर कुकरचा अँगल सेट करणे. वातावरणातील तापमान नोंदविणे व अन्नपदार्थ शिजल्यावर अन्न पदार्थांचे तापमान मोजणे. ट्रे वरील काचेची फ्रेम अन्नपदार्थ पूर्ण शिजण्याआधी उघडू नये. अन्न शिजविण्याची ज्या जागेवर सूर्यकिरण व्यवस्थित उपलब्ध असतील भांडी अशी जागा उदा. टेरेस किंवा खुले मैदान अशा जागेवर उष्णतारोधक पेटी सोलर कुकर ठेवणे. (५) सोलर कुकर सूर्य किरण ज्या रेषेत येतात त्यानुसार अँगल सेट करणे. (६) सोलर कुकरमधील पॉट होल्डर ट्रेमध्ये एका भांड्यात अन्नपदार्थ एकत्र करून ते अन्नपदार्थ एकत्र केलेले __ भांडे सोलर कुकरमधील ट्रेमध्ये ठेवणे. (७) ट्रेवर असलेली काचेची फ्रेम व्यवस्थित लावून अन्नपदार्थ शिजण्यासाठी ठेवलेली वेळ नोंद करणे. (८) सोलर कुकरमध्ये काळा रंग का देतात, काळा रंग उष्णता शोषून घेतो इत्यादी ते स्पष्ट करणे. (९) शिजविलेल्या पदार्थातील सत्त्वांश टिकून राहतात. खालील तक्ता प्रात्यक्षिक करते वेळी भरणे. कालावधी/वेळ - २ तास | अन्नपदार्थ | तांदूळ १०० ग्रॅम | डाळ १०० ग्रॅम अंडी ४ | सोलर कुकरमध्ये शिजण्यास लागलेला कालावधी आरसा तापमानः १ १ निदेशकांसाठी सूचना : जेव्हा तुम्ही सोलर कुकर उन्हामध्ये ठेवाल तेव्हा विद्यार्थ्यांना विणकामाचे किंवा शिवणकामाचे प्रात्यक्षिक करण्यास द्या. संदर्भ : • शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९ वी, पान नं. १६७-१६८, • विज्ञान आणि तंत्रज्ञान-I, इ. ९ वी, पान नं. १३४ ते १३७, • विज्ञान आणि तंत्रज्ञान-I, इ.१० वी, पान नं.८७ ते ९१ ३१