________________
संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी, पान नं.२१६ ते २१८.. सामान्य विज्ञान : भाग-३, इ. ५ वी, पान नं.९ ते २४. विज्ञान आणि तंज्ञान : भाग - २, इ.१० वी, पान नं.४९ ते ६१,११७ ते १३२... दिवस : नववा प्रात्यक्षिक : सोलर कुकरचा वापर करून अन्नपदार्थ शिजविणे. प्रस्तावना : निसर्गातील सूर्यप्रकाश व वारा यांचा वापर पारंपरिक पद्धतीने आपण करत आहोतच. उदा.धान्य, कपडे, सुकविणे, वाळविणे. इ. सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. पृथ्वीला प्रावरणाच्या स्वरूपात सूर्यापासून उष्णता मिळते. सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 10K (केलव्हिन) आहे असे अनुमान आहे. सूर्यामध्ये केंद्रकीय एकीकरण पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. केंद्रकीय एकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके निर्माण होतात. केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेच्या परिणामाने निर्माण झालेली ऊर्जा, प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. Solar Energy चे इतर उपयोग उदा. वीज (सोलर पॅनल) पूर्वतयारी : (१) सोलर कुकर चालू स्थितीत आहे की नाही हे आदल्या दिवशी पाहून घ्या. (२) सोलर कुकरमध्ये शिजवण्याचे पदार्थ उदा. तांदूळ, डाळ, अंडी, बटाटे आणून ठेवणे. (३) थर्मामीटरची (300°C) व्यवस्था करून ठेवा. उपक्रमाची निवड : (१) सोलर कुकरमध्ये आत डाळ शिजवून विद्यार्थ्यांना खाण्यास द्या व चव कशी लागते हे विचारा. (२) २५० ग्रॅम तांदूळ सोलर कुकरमध्ये व २५० ग्रॅम तांदूळ स्टोव्हवर शिजवावेत. तांदूळ शिजविण्यासाठी किती रॉकेल लागेल त्याचे मोजमाप करणे. म्हणजे EnergyEquivalent काढता येईल. (३) अंडी, तांदूळ, बटाटे हे पदार्थ शिजवण्यास किती तापमान लागेल व किती वेळ लागेल याच्या नोंदी घ्याव्यात. (४) दूध, पाणी तापविण्यास किती तापमान व वेळ लागेल याची नोंद घ्या. अपेक्षित कौशल्ये : (१) सूर्य किरणांच्या दिशेनुसार सोलर कुकरची दिशा निश्चित करणे. (२) आरशावरील प्रतिबिंब बरोबर काचेवर पाडणे. (३) सोलर कुकरमध्ये विविध पदार्थ शिजविता येणे. दक्षता : (१) सोलर कुकर उचलताना काच व आरसा फुटणार नाही याची काळजी घेणे. (२) पाणी सोलर कुकरच्या आतमध्ये सांडणार नाही याची काळजी घेणे. (३) सोलर कुकरवर उभे राहू नये अथवा वजनदार वस्तू ठेवू नये. मर्यादा : (१) सोलर कुकरचा वापर उन्हाळ्यात, तसेच जेव्हा आकाशात ढग नसतात तेव्हाच करता येतो. (२) पावसाळ्यात सोलर कुकरचा वापर कमी होतो. विशेष माहिती: सौर कुकर : बाजारात भिन्न आकाराचे व भिन्न धारकता असलेले सौर कुकर उपलब्ध आहेत. सौर कुकर हा प्लास्टिक किंवा तंतूकाच (ग्लासवुल) यासारख्या अवाहक पदार्थापासून बनविलेला असतो. या पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो. त्यावर पडणाऱ्या प्रावरणाच्या ९८% भाग काळा रंग शोषून घेतो. या पेटीतील उष्मा बाहेर जाऊ नये म्हणून ही पेटी जाड अशा अवाहक पदार्थापासून बनविलेली असते. त्याला काचेचे झाकण असते. काचेच्या झाकणामुळे पेटीच्या आतील उष्णता बाहेर पडू शकत नाही. वरील बाजूस बिजागिरीच्या ३०