पान:गृह आरोग्य.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) उरलेल्या ५७५ कॅलरीज मिळविण्यासाठी १५० ग्रॅम तांदूळ घ्यायला हवेत. अनुमान: । पदार्थ वजन प्रथिने कॅलरीज | तांदूळ १५० ग्रॅम ०५७५ डाळी ८० ग्रॅम ६० १६०० तेल २५ ग्रॅम | ०० ०२२५ एकूण ६० । २४०० दक्षता व काळजी : (१) वजनकाटा वापरण्यापूर्वी त्याची अचूकता तपासून घ्या. कोणतेही वजन त्यात ठेवलेले नसताना त्याचा काटा शून्यावर असला पाहिजे. (२) व्यक्तीच्या वजनानुसार प्रथम प्रथिनांचे वजन निश्चित करून घ्यावे, त्यानंतर स्निग्ध पदार्थाचे व सर्वात शेवटी पिष्टमय पदार्थाचे वजन ठरवावे. शिक्षक कृती:(१) पुढील काही सामाजिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून तक्ते, प्रसंग नाट्य, पथनाट्य, विनोदी किंवा विडंबनात्मक प्रहसने इ. तयार करणे व सादर करणे. जास्त शारीरिक कष्ट करणाऱ्यांनी जास्त कॅलरीजचा आहार घ्यायला हवा असे आहारशास्त्र सांगते. पण प्रत्यक्षात जास्त शारीरिक कष्ट करणाऱ्यांचेच उत्पन्न कमी असते आणि त्यामुळे ज्यांना जास्त कॅलरीजची गरज आहे अशांनाच अन्न कमी कॅलरीजचे मिळते, याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगा. कमी शारीरिक कष्ट करणाऱ्यांचे उत्पन्न जास्त असते आणि गरज नसूनही ते जास्त कॅलरीजचे अन्न खातात. त्यामुळे मधुमेह, ब्लडप्रेशर इ. आजार 'श्रीमंतीचे आजार होतात, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगा. (४) पॉलिश केलेले धान्य, हायब्रीड धान्य आणि गावरान वाणाचं धान्य यातील कॅलरीज व पोषणमूल्यांची तुलना विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. ज्याला पटकन कीड लागते ते अन्न जास्त पोषक असते. जे किड्यांना कळतं ते माणसाला कळत नाही, माणूस हायब्रीड आणि पॉलिश केलेले निकृष्ट अन्न जास्त किंमत देऊन खरेदी करतो, हे सांगणे. (६) शरीराच्या दर किलो वजनामागे १ ग्रॅम प्रथिन अन्नातून मिळाले पाहिजे. म्हणजे ७० किलो वजनाच्या व्यक्तीला रोज ७० ग्रॅम प्रथिनांचा पुरवठा आहारातून व्हायला हवा. (७) प्रत्येक प्रौढ व्यक्तीला रोज १५ ते ५० ग्रॅम स्निग्ध पदार्थ अन्नातून मिळाले पाहिजेत. माहिती : कॅलरी या एककामध्ये ऊर्जा मोजतात. मनुष्य काम करतो तेव्हा शरीरातील ऊर्जा खर्च करतो. आहारातून ऊर्जा मिळते. कोणत्या अन्नातून किती ऊर्जा मिळते, आपल्याला किती ऊर्जेची गरज असते, त्यासाठी कोणते अन्न किती खावे, या गोष्टींचा विचार म्हणजे 'आहारशास्त्र'. आहारशास्त्रानुसार शारीरिक कष्ट कमी करणाऱ्यांना कमी ऊर्जा लागते. म्हणून त्यांनी कमी कॅलरी'चे अन्न खावे. खूप शारीरिक कष्ट करणाऱ्यांनी जास्त 'कॅलरीज' देणारे अन्न खावे. शरीरात गरजेपेक्षा जास्त ऊर्जा साठली तर त्यामुळे वेगवेगळे रोग होऊ शकतात. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला रोज २४०० कॅलरीज अन्नातून मिळाल्या पाहिजेत. १ ग्रॅम प्रथिनात ४ कॅलरीज, १ ग्रॅम स्निग्न पदार्थात ९ कॅलरीज, १ ग्रॅम पिष्टमय पदार्थात ४ कॅलरीज असतात. समतोल आहाराचे एक उदाहरण : _ पदार्थ रोजच्या आहारातील वजन पदार्थ रोजच्या आहारातील वजन तृणधान्ये : गहू, तांदूळ, ज्वारी बाजरी इ. ४०० ग्रॅम दूध, दही इ. १२० ग्रॅम पालेभाजी, फळे इ. ३५० ग्रॅम | तेल, तूप इ. २५ ते ५० ग्रॅम डाळी, कडधान्ये इ. ८० ग्रॅम साखर, गूळ इ. ५० ग्रॅम पहाइ.