Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण. गार्टर स्टिच २५ सेंमी. (६) शो बटन्स, प्रेस बटन्स व सुई दोरा : याचा उपयोग स्वेटर्स, जाकीट, कोट यांना लावण्यासाठी व सुशोभित करण्यासाठी केला जातो. विविध आकारांची, रंगांची शो बटन्स बाजारात उपलब्ध असतात. प्रात्यक्षिक क्र.२ - अ) विणकाम - गार्टर स्टिच उद्देश : गार्टर स्टिच वापरून मफलर विणणे. अपेक्षित कौशल्ये : (१) विणकामाच्या सुयांचे नंबर व त्यांची जाडी यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात येणे. (२) सुईवर पहिला टाका घेता येणे. (३) पहिल्या ओळीतील सर्व टाके हाताने किंवा दुसऱ्या सुईने विणून घेता येणे. (४) सुलट टाके व उलट टाके विणता येणे. साहित्य : विणकामाच्या १० नंबरच्या सुयांची जोडी, ३ किंवा ४ प्लायची लोकर ५० ग्रॅम. कृती: १०० सेंमी. (१) दहा नंबरच्या एका सुईवर ७६ टाके हाताने किंवा दुसऱ्या सुईने विणून घ्या. साधारणपणे ३ किंवा ४ प्लायची लोकर वापरून ७६ टाके घातल्यास २५ सेंमी. रुंद विणकाम तयार होते. (२) सर्व टाके सुलट विणून घ्या. (३) सुई बदलल्यानंतरसुद्धा सर्व टाके सुलट विणून घ्या. (४) अशा प्रकारे सर्व सुया सुलट विणून घ्या व २० सेंमी. लांबीचा मफलरचा सुरुवातीचा भाग तयार करा. दक्षता व काळजी: (१) टाके विणताना लोकर खूप ताणू नये किंवा अवाजवी सैल सोडू नये. (२) सुया व लोकर दोन्ही हलक्या हाताने वापरावे. शिक्षक कृती : या प्रात्यक्षिकामध्ये सर्व टाके सुलट विणायचे आहेत. विद्यार्थ्याला एकदा सुलटे टाके विणता यायला लागले, सुया बदलता यायला लागल्या की प्रात्यक्षिकाचे पूर्ण गुण द्यावेत. मफलरे उरलेले विणकाम विद्यार्थ्याला सवडीनुसार करू द्यावे. वर्ष अखेरीस मफलर पूर्ण झाला की नाही यावर लक्ष ठेवावे. प्रात्यक्षिक क्र. २ - ब) विणकाम - स्टॉकिनेट स्टिच उद्देश : स्टॉकिनेट स्टिच वापरून मफलरचा मधला भाग विणणे. अपेक्षित कौशल्ये : (१) विद्यार्थ्याला सुलट व उलट दोन्ही प्रकारचे टाके विणता येणे. (२) टाके बंद करता येणे. साहित्य : विणकामाच्या १० नंबरच्या सुयांची जोडी, ३ किंवा ४ प्लायची लोकर. कृती :(१) प्रात्यक्षिक २अ मधील गार्टर स्टिचने विणलेले २० सेंमी. लांबीच्या स्टॉकिनेट विणकामातील सर्व टाके उलट विणून घ्या. स्टेिच (२) सुई बदलल्यानंतर सर्व टाके सुलट विणून १०० सेंमी. घ्या. (३) याप्रकारे एक संपूर्ण सुई सुलट व दुसरी संपूर्ण सुई उलट विणून घ्या, ६०सेंमी. लांबीचे विणकाम तयार करा. (४) सुरूवातीचे २० सेंमी. लांबीचे गार्टर स्टिच विणकाम व त्यापुढील ६० सेंमी. लांबीचे स्टॉकिनेट स्टिचचे विणकाम तयार झाल्यानंतर पुन्हा गार्टर स्टिचने पुढील २० सेंमी. चे विणकाम करा. (५) टाके बंद करा. शिक्षक कृती : प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता लक्षात घेऊन १ मीटर लांबीचा मफलर किंवा ५ सेंमीx ५ सेंमी. मापाचा फक्त विणकामाचा नमुना किंवा अन्य एखादे उपयोगी विणकाम द्यावे. सरसकट सर्वांना एकच काम देऊ नये. क्षमतेनुसार दिलेल्या कामापैकी किती काम तो विद्यार्थी कसे पूर्ण करतो यावर त्याचे गुणांकन करावे. २६