पान:गृह आरोग्य.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संदर्भ : गार्टर स्टिच : शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९ वी, पान नं.२०७ व २०८. स्टॉकिनेट स्टिच : शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९ वी, पान नं.२१०,२११, कार्यानुभव शिक्षक हस्तपुस्तिका, इ.१०वी (क्रोशाकाम व विणकाम), पान नं.४३ ते ४९, कार्यानुभव शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९ वी (क्रोशाकाम व विणकाम), पान नं.१२ ते १९. उपक्रम : (१) मफलर विणणे. (२) स्कार्फ विणणे. (३) इंटरनेटवर विणकाम करताना सुया कशा पकडाव्या व लोकर कशी एकमेकांमध्ये घालावी हे पाहणे, दिवस : आठवा प्रात्यक्षिक: धान्य, कडधान्ये व डाळी यातील कॅलरीज व प्रोटीन यांचा अभ्यास करणे प्रस्तावना : सर्वच सजीवांना त्यांच्या वाढीसाठी व जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक ती सर्वच मूलद्रव्ये अन्नातूनच मिळतात. शरीराच्या सर्व क्रियांसाठी लागणारी ऊर्जा ही आपल्याला अन्नातूनच मिळते. त्यामुळे अन्न ही शरीराची मूलभूत गरज असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी व उत्तम आरोग्य राखण्यासाठी अन्नाची जरूरी असते. अन्नाशिवाय आपले शरीर उबदार राहणार नाही. तसेच शरीरपेशी व उतींची वाढ होणार नाही, अन्नाशिवाय कोणत्याही क्रिया करणे अशक्य होईल. ही सर्व महत्त्वाची कार्ये होण्यासाठी शरीराला आवश्यक अशी रासायनिक पोषणद्रव्ये अन्नाद्वारे मिळतात. पूर्वतयारी : वेगवेगळ्या डाळी विद्यार्थ्यांना दाखवा, त्यांची नावे सांगा. उपक्रमांची निवड करणे : (१) शाळेतील पोषण आहारातून मुलांना किती कॅलरीज मिळतात, हे काढणे. (२) दररोज तुम्ही घेत असलेल्या आहाराची नोंद एक आठवडा भर सतत ठेवा व एका आठवड्यानंतर तुम्ही घेतलेल्या आहारातून प्रथिने, कॅलरी, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके मिळाले ते पाहणे. (३) विविध पदार्थांची यादी करून त्यातील प्रथिने, कॅलरी, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके यांच्या नोंदी घेणे, (४) सर्व धान्य कडधान्य, डाळी यांच्या कॅलरीज काढून (१०० ग्रॅम मध्ये) तक्ता करून वर्गात लावणे, अपेक्षित कौशल्य : (१) कॅलरीज म्हणजे काय? (२) प्रोटीन म्हणजे काय? (३) कॅलरीज व प्रोटीनचे आपल्या शरीरातील कार्य काय? (४) कॅलरीज व प्रोटीन जास्त झाल्यावर कोणते दुष्परिणाम होतात? विशेष माहिती: कॅलरीज: सर्वात जास्त कॅलरीज असणाऱ्या पदार्थांची नावे विद्यार्थ्यांना सांगा. अन्नाची व्याख्या : आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निगा राखण्यासाठी ज्या पदार्थांचे चयापचय आणि सात्मीकरण घेऊन ऊर्जा मिळते त्या पदार्थांना अन्नपदार्थ म्हणतात. दक्षता : (१) जास्त कॅलरीयुक्त पदार्थ सेवन करू नये. (२) कामानुसार व ऋतुनुसार आहार घ्यावा. अतिकॅलरीयुक्त आहाराचे सेवन : स्निग्ध पदार्थ आणि कार्बोदके यांसारख्या अतिकॅलरीयुक्त अन्नपदार्थांचे सेवन जर आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात केले तर खालील रोग होतात. (१) अतिलठ्ठपणा (२) देह वस्तुमान निर्देशांक = वजनKg/उंची m (३) ब्रॉक निर्देशक = उंची cm-100 (४) मधुमेह, हृदयरोग इ. शिक्षक कृती: (१) कॅलरीज व प्रोटीनबद्दल विद्यार्थ्यांना माहिती द्या. (२) आहार म्हणजे काय हे सांगा. (३) धान्ये, कडधान्ये विद्यार्थ्यांना दाखवा. २७