________________
प्लाय-४ विणकाम सलग करता येते. (ड) वायर लावलेली सुई : या सुईचा उपयोग अखंड स्वेटर व शालीसाठी केला जातो. टाके निसटून जाऊ नयेत म्हणून ही सुई वापरली जाते. लोकरीचे प्रकार : लोकर विविध रंगामध्ये मिळते. लोकरीचे गुंडे २५ ग्रॅम वजनाचे असतात. गुंड्यांवर कागदी वेष्टण असते. जे जपून ठेवावे. त्यामुळे पुन्हा त्याच प्रकारची लोकर गरज लागल्यास वेष्टण दाखवून मिळू शकते. लोकर लडीमधून मिळते. या लडी ग्रॅम व किलोवर मिळतात. दुकानात विविध प्रकारच्या, विविध कंपन्यांच्या लोकरी मिळतात. रंगछटांचे तक्ते पहायला मिळतात. त्यातून रंगांची निवड करता येते. (१) बेबीवुल : लहान मुलांचे कपडे विणण्यासाठी अतिशय मऊ लोकर मिळते, तिला बेबीवुल म्हणतात. (२) फरवुल : मऊ, लव असलेल्या लोकरीस फरवुल म्हणतात. (३) क्रेपवुल : विशिष्ट प्रकारचा खरखरीतपणा असलेल्या लोकरीस क्रेपवुल म्हणतात. जाड कोट विणण्यासाठी याचा उपयोग करतात. (४) नायलॉन व ऑरलॉन लोकरः ही लोकर अत्यंत तलम व मउ तिला चमक असते. वजनाला कमी असल्याने ती जास्त लांब (५) टू-प्लाय : या लोकरीचा धागा उलगडल्यावर त्याला दो सिक्स असतात. ही लोकर कमी जाडीची असते. (६) श्री प्लाय, फोर प्लाय, सिक्स प्लाय : या लोकरीचे पदर तीन, चार व सहा असतात. (७) सुतळी किंवा गोफाचा वापर करूनही क्रोशाकाम करता येते एकसारख्या जाडीच्या, मऊ लोकरीचा वापर करतात. आर करतात. लहान मुलांसाठी कपडे विणताना सौम्य रंगा विणण्यासाठी गडद रंग वापरतात. साधने - इतर साहित्य व साधने: स्टिच होल्डर Ca (१) सुया (२)लोकर (३) स्टिच होल्डर (४) सेफ्टी पिन हेअर पिन -- (५) टेपेस्ट्री-सुई/क्रोशाची सुई (६) रंगीत शो-बटन्स,सुई, दोर (१) सुयाः लोकरीचे विणकाम करताना दोन सुयांची आवश्यकता असते. या सुयांना जाडीनुसार ६ ते १७ नंबर दिलेले असतात. सुयांचे ३ प्रकार असतात : १) साध्या सुया २) चार सुया (दोन्ही बाजूंनी टोके असणाऱ्या) ३) गोल सुई (सलग विणकामासाठी) (२) लोकर : लोकरीची जी वस्तू आपण बनवणार आहोत त्यानुसार योग्य प्लायची (पदराची), रंगाची लोकर विणकामाकरिता वापरावी. (३) स्टिच होल्डर : याचा उपयोग टाके बाजूला काढून ठेवण्यासाठी होतो. स्टिच होल्डरच्या एका टोकाकडे हूक असतो. त्या हूकमध्ये त्याचे दुसरे टोक अडकवावे लागते म्हणजे टोके निसटत नाहीत. (४) सेफ्टी पिन : ही पिन लांबट व मोठी असते. स्टिच होल्डर उपलब्ध नसेल तर लांब पिनेचा उपयोग करावा. (५) टेपेस्ट्री सुई : विणकामाचे निरनिराळे भाग एकत्र करून शिवण्यासाठी टेपेस्ट्री सुईचा वापर करतात. ही सुई टोकाकडच्या बाजूस बोथट असते आणि नेढाही चपटा असतो, त्यामध्ये लोकर ओवणे सहज शक्य असते. दोन सुया २५