Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तात्विक भाग (Theory):क्रोशाकाम व विणकाम करताना लागणाऱ्या सुया, दोरा, लोकर, नायलॉन दोरा इत्यादी साधनांची माहिती. सुया : दोराकाम करण्यासाठी लोखंडीची गिलीट केलेली सुई वापरतात. लोकरकाम करण्यासाठी प्लॅस्टिकच्या सुया वापरतात. सुईचा नंबर जितका मोठा असतो, तितका सुईच्या टोकाचा हूक लहान असतो. सुईचा नंबर जितका लहान तितका पुढील बाजूस असलेला हूक मोठा असतो. सुईचे टोक किंचित बाकदार असते. मध्यभाग चपटा असतो. सुईची लांबी १० ते १५ सें.मी.असते. सुई खराब होऊ नये म्हणून त्याला टोपण असते ते लावावे. लोकरीचे क्रोशाकाम ज्या सुईपासून करतात, या सुईला 'हरिओपिन्स' म्हणतात. लोकरीचे क्रोशाकाम करण्यासाठी ११ ते १५ नंबरच्या सुया वापरतात. दोरा : शून्य नंबरपर्यंतचा दोरा बंडल, लडी, गुंड्यामध्ये मिळतो. दोऱ्याचा नंबर जितका जास्त तितका दोरा बारीक असतो. क्रोशाकामाचा दोरा मजबूत, चमकदार असतो. वेगवेगळ्या कंपनीचे दोरे बाजारात मिळतात. सर्वसाधारणपणे ४० ते ५० नंबरचा दोरा वापरावा. गुंड्यातील दोरा नरम असतो. त्या दोऱ्यापासून बनविलेली वस्तू नरम होते. रिळाचा दोरा कडक असतो. त्या दोन्यापासून बनवलेल्या वस्तू कडक बनतात. बोटाला गुंडाळलेला दोरा व त्याचा ताण फार घट्ट किंवा सैल न करता मध्यम ठेवावा म्हणजे केलेले काम सुबक व आकर्षक होते. लोकर: ज्या प्रकारची वस्तू आपण बनवणार आहोत त्या प्रकारची लोकर क्रोशाकामासाठी वापरता येते. नायलॉनचा जाडा दोरा : क्रोशाकामासाठी पिशव्या, बटणे विणतात, रंगीबेरंगी नायलॉन धागा क्रोशासाठी वापरून विविध आकर्षक वस्तू बनवता येतात. दोन सुयांवरील विणकामासाठी लागणारे साहित्य व साधने यांची माहिती PRसाच्या पाई (१) सुयांचे प्रकार : फार पूर्वी विणकाम करताना लाकडाच्या किंवा हाडांच्या बनविलेल्या सुयांचा वापर केला जात असे; परंतु असे आढळून आले आहे की या सुया अल्पावधीतच मोडून जात असत. हा दोष लक्षात घेऊन नंतर नवीन प्रकारच्या टिकाऊ, वजनाने हलक्या, सहजासहजी न मोडणाऱ्या, टोकदार व मिश्रधातुपासून बनविलेल्या सुया तयार करण्यात आल्या. या सुया साधारणपणे ६ ते १७ नंबरपर्यंत असतात. वाढत्या नंबरानुसार सुयांची जाडी कमी होत जाते. ज्या प्रकारच्या वस्तू वायरची सुई बनवायच्या आहेत त्याप्रमाणे कमी-जास्त लांबीच्या व जाडीच्या सुया वापरल्या जातात. सुयांचे प्रकार : (अ) दोन सुया . (ब) चार सुया, (क) गोल सुई, (ड) वायर लावलेली सुई. (अ) दोन सुया : अॅल्युमिनियम किंवा मिश्रधातूपासून या सुया बनवतात. याची लांबी २५ ते ३० सेंमी असते. एका बाजूचे टोक निमुळते व बोथट असते. दुसऱ्या बाजूचे टाके निसटू नयेत म्हणून प्लॅस्टिकचा किंवा धातुचा गोलसर गोळा (बटणासारखा भाग) असतो. त्यावर सुईचा नंबर लिहिलेला असतो. बाहीची मनगट पट्टी व गळपट्टी विणताना, स्वेटरचा काठ विणताना ११ किंवा १२ नंबरच्या सुया वापरतात. नायलॉन दोरा, एकपदरी, दुपदरीचे लोकरीचे विणकाम करतानाही ११ व १२ नंबरच्या सुयांचा वापर करतात. (ब) चार सुया : गोल व व्ही आकाराचा गळा, पायमोजे, हातमोजे, टोप्या वगैरे विणताना या सुयांचा वापर करण्यात येतो. या सुयांना दोन्ही बाजूंनी निमुळती टोके असतात. वाढत्या क्रमांकानुसार सुयांची जाडी कमी होते. (क) गोल सुई : ही सुई ॲल्युमिनिअम धातुपासून बनवतात. सुईची दोन्ही टोके गोलाकारात जवळ येतात. सुयांना वरीलप्रमाणे नंबर दिलेला असतो. चार सुयांच्या विणकामात सुया एकसारख्या बदलाव्या लागतात, परंतु गोल सुई एकसारखी बदलावी लागत नाही. २४