पान:गृह आरोग्य.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपक्रमांची निवड करणे : (१) वर्गासाठी तोरण करणे. (२) ताटावरील रूमाल तयार करणे. (३) मोजे, कानटोपी तयार करणे. अपेक्षित कौशल्ये : (१) सुई पकडता आली पाहिजे. (२) लोकर व्यवस्थित पकडता आली पाहिजे. विशेष माहिती: (१) गार्टर स्टिच तयार झाल्यावर त्याची वीण सर्व ठिकाणी सारखी दिसावी. (२) स्टिच व्यवस्थित बंद करावे. (३) शेवटची गाठ नीट मारावी. (१) गार्टर स्टिच : गार्टर स्टिच करताना टाके दोनच्या पटीत घ्यावेत. उदा. २,४,६,८,१०. तसेच हे पॅटर्न करताना सर्व टाके सुलट करावेत. (२) स्टॉकिनेट स्टिच : स्टॉकिनेट स्टिच करताना टाक २ च्या पटीत घ्यावेत. उदा. २,४,६,८,१०. तसेच हे पॅटर्न करताना एक ओळ सुलट व एक ओळ उलट अशा पद्धतीने हे पॅटर्न करावेत. शिक्षक कृती :(१) विणकामाबद्दल माहिती मुलांना सांगा, मशीनवर विणकाम होते. (२) लोकरीचे प्रकार सांगा. (३) सुयांचे प्रकार सांगून ते कोणत्या ठिकाणी कोणत्या सुया वापरायच्या हे सांगा. (४) १० नंबरच्या सुया हातामध्ये कशा धरायच्या हे सांगा. (५) लोकर दोरा मुठीमधून कसा पकडायचा हे सांगा. (६) विणकाम करताना सर्वात प्रथम जी गाठ मारली जाते ती कशी मारायची हे तुम्ही करून दाखवा. (७) मुलांना टाके कसे घालायचे हे शिकवा. (८) तुम्ही दुसरी सुई घेऊन कसे विणकाम चालू करायचे हे दाखवा. (९) मुले विणकाम करताना त्यांना मधून मधून पहिल्यांदा जेवढे टाके घातले तेवढे आहेत की नाही हे पाहण्यासाठी टाके मोजण्यास सांगा. (१०) पॅटर्न झाल्यावर बंद करण्याच्यावेळी तुम्ही त्यांना दोन टाके कसे बंद करायचे हे करून दाखवा. (११) तयार केलेले पॅटर्न मुलांना त्यांच्या पॅक्टीकल वहीत चिटकवण्यास सांगा. दक्षता : (१) सुई लागणार नाही ही काळजी घेणे. (२) विणकाम करताना टाके वाढणार नाही हे पहावे. (३) उलट ओळ करताना हातातील धागा वरच्या बाजूनचे टाकला गेला पाहिजे. प्रोत्साहनपर करावयाचे उपक्रम : (१) तोरण, रुमाल, कानटोपी, हातमोजे इ. तयार उत्पादीत मालाचे प्रदर्शन भरवावे व त्याची विक्री करावी. (२) 'आयबीटी' Day ला शाळेच्या प्रार्थनेत विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू सर्व मुलांना दाखवून त्यांचे कौतुक करणे. कृती : गार्टर स्टिच : (१) चाडी गाठ बांधून त्यात १० नंबरची एक सुई घाला. (२) ज्या बाजूला दोऱ्याचे टोक आहे त्या दोऱ्याला मधल्या बोटाशेजारील बोटाला आढा मारून त्याच सुईने तो धागा सुईत घाला व दुसऱ्या हाताने दुसरा दोरा त्यावर टाकून हलकासा ओढा व पुन्हा बोटातील धागा त्या सुईवर टाकून दोन्ही दोरे हलकेसे ओढा व अशाप्रकारे १८ टाके टाका. (३) आता दुसरी सुई घेऊन पहिल्या सुईच्या टाक्यातील सर्वात वरच्या टाक्यामध्ये सुई खालच्या बाजूने घालून इंग्रजी x चिन्हासारखे होईल तेव्हा हातातील धागा मोठा आहे त्या सुईवर टाकून हलकासा ओढा. (४) आता ती २ नंबरची टाकलेली सुई मागे ओढा व अशी ओढा की धागा त्यातून निसटणार नाही व मागे आल्यावर पहिल्या सुईमधील टाका त्या सुईतून सोडून द्या. तो टाका आपोआप दुसऱ्या सुईवर जातो. (५) अशा प्रकारे आपले पॅटन तयार होईल. पॅटर्न बंद करणे : (१) सुरुवातीला सर्व टाके एकाच सुईवर घ्या. (२) आता दुसरी सुई घेऊन त्या सुईवर दोन टाके पहिल्या पद्धतीने घ्या. (३) पुढे पहिली सुई उलटी म्हणून वरून दुसऱ्या सुईतून काढून टाका. (४) अशाप्रकारे सर्व टाके संपतील व शेवटी दुसरी सुई काढून गाठ तयार होते. २३