________________
दक्षताः (१) सुईमध्ये दोरा घालताना नीट घालावा. (२) टीप घालताना सुई कोणाला टोचणार नाही ना याची काळजी घेणे. (३) कापड व्यवस्थित धरावे. (४) कापड आधी व्यवस्थित घडी घातली गेली पाहिजे (शिलाईच्या ठिकाणी) शिक्षक कृतीः (१) विद्यार्थ्यांना शिलाईविषयी (टाक्याचे प्रकार इत्यादी.) माहिती सांगा (२) कोणता टाक्याचा प्रकार, कोणत्या ठिकाणी, का वापरला जातो हे सांगा. (३) विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे योग्य ते उपयोग व ते कसे वापरावयाचे हे सांगा. (४) तुम्ही आणलेल्या सुती कापडातील ६४ ६" मापाचे कापडाचे तुकडे कापून प्रत्येक विद्यार्थ्यास द्या. त्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यास १ सुई व १ मीटर दोरा द्या... सुरुवातीला कडा 4mm. मोजून घेऊन मुडपून टाके कसे टाकावे हे तुमच्या रुमालावर (कपड्याच्या तुकड्यात) करून दाखवा... (६) विद्यार्थ्यांनाही टाके टाकण्यास सांगा व तुम्ही त्यांना मदत करा. (७) सर्व विद्यार्थ्यांना सोबत टाके टाकून पुढे नेण्याचा प्रयत्न करा. (८) कापडाच्या कडा मुडपून झाल्यावर तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांचा रुमाल पाहा. उपक्रम (लोकोपयोगी सेवा) (१) शाळेतील पडदे शिवणे. (२) शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या शर्टाच्या गुंड्या तुटल्या आहेत त्या लावून देणे. (३) जुन्या कापडाच्या पिशव्या शिवणे. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका (VI), इ. ९ वी, पान नं. १९७ ते २०९. जरा डोके चालवा: (१) उलटी टीप व धावदोरा यांपैकी जास्त पक्का टाका कोणता? (२) पक्क्या हातशिलाईसाठी उलटी टीप का घालतात? (३) दर्शनी भागाच्या कडा दुमडण्यासाठी हेम का वापरतात? दिवस : सातवा प्रात्यक्षिक : गार्टर, स्टॉकिनेट स्टीचचे प्रत्येकी एक पॅटर्न बनविणे. प्रस्तावना : जगामध्ये सर्वात जास्त विणकाम हे नेपाळ, जपान, अमेरिका व भारत देशात जास्त केले जाते. विविध प्रकारच्या वीण असलेल्या पुस्तकात कल्पकतेने खूप भर पडत आहे. या वीणीचा उपयोग स्वेटर्स, शाली इ. लोकरीचे कपडे बनविण्यासाठी होतो. दोन्याच्या साहाय्याने तोरणे, रुमाल, पिशव्या इ. अनेक शोभिवंत व नाजूक वस्तू बनविल्या जातात. टाक्यांसाठी असलेल्या खुणा व आराखड्यांवरून कोणीही हे विणकाम करू शकते. त्याला भाषेचा अडसर येत नाही. विणकाम जरी मशीनवर करता येत असले तरी त्याला वीणींच्या मर्यादा पडतात. तसेच हे विणकाम सैलसर करता येते व लोकरीचा पुनर्वापर करता येतो. विणकामामुळे एकाग्रता, सौदर्यदृष्टी व नीटनेटकेपणा या गुणांचे संवर्धन होते. पूर्वतयारी : आपल्याकडे येणाऱ्या गटामध्ये किती मुले/मुली आहेत, त्यासाठी लागणारे साहित्य तसेच मटेरिअलची पूर्ण तयारी करणे. प्रत्येकी विद्यार्थ्यांना किती लोकर घ्यावयाची ते निश्चित झाले पाहिजे. मुलांना विणकाम आवडणार नाही तर त्यासाठी त्यांना संबंधी बदली एखादी चित्रफित दाखविता येईल का याचे नियोजन करणे. (सी.डी.वरील विणकामाची चित्रफीत मुलांना दाखवावी.) मुलांना विणकाम करण्यासाठी घरी सुया देता येतील का याचे नियोजन करणे. २२