Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता व काळजी: (१) प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी अँटिसिरा A व B च्या बाटल्या फ्रीजबाहेर काढून ठेवा. यामुळे त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी अँटिसिरांचे तापमान वातावरणाच्या तापमानाएवढे होईल. (२) अँटिसिरा Dचे तापमान नेहमी २ ते ६ अंश सेल्सिअस ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष वापरापूर्वी फक्त ५ मिनिटे अँटिसिरा Dची बाटली फ्रिजबाहेर काढावी व वापर झाल्यानंतर लगेच फ्रिजमध्ये ठेवावी. (३) काचपट्टीवरील तपासणीमध्ये Rh फॅक्टर ठरविता आला नाही तर रक्ताचा नमुना परीक्षानळीमध्ये घेऊन त्यात अँटिसिरा D चा एक थेंब टाकावा व ०.९% सलाईनचे थेंब टाकून गुठळ्या नाहीत याची खात्री करून घ्यावी. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी, पान नं.२२४ ते २२६, घटक : हिमोग्लोबीन, पान नं.२२७ ते २२९. सामान्य विज्ञान, इ. ७ वी, पान नं.११३ व ११४. दिवस : सहावा प्रात्यक्षिक : शिवणीचे धाव दोरा व उलटी टीप वापरून रुमाल बनविणे. प्रस्तावना : आजकाल लोक विविध प्रकाराचे, फॅशनचे कपडे वापरतो. विविध प्रकारचे आकाराचे कपडे कसे तयार होतात, म्हणजे कोणत्या प्रकारे शिलाई केली असलली असते हे पाहावयाचे आहे. तसेच शिलाईचे अनेक वेगवेगळे प्रकार आपणास पाहायचे आहेत. तसेच कोणत्या शिलाईचा प्रकार कोणत्या ठिकाणी वापरावयाचा हे सुद्धा आज आपणास पहावयाचे आहे. तसेच कोणत्या शिलाईचे कोणते नाव आहे हे सुद्धा शिकावयाचे आहे. पूर्व तयारी : आपल्याकडे येणाऱ्या गटामध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यासाठी लागणाऱ्या साहित्य तसेच मटेरिअलची पूर्ण तयारी करावी. प्रात्यक्षिक करताना बैठक रचनेचे नियोजन करा. पॅक्टीकलला सुरुवात करण्यापूर्वी मुलांना त्याबाबत काही माहितीपट दाखवणार असाल तर लाईट तसेच संगणक याची उपलब्धता असणार आहे की नाही ते पाहून घेणे. प्रात्यक्षिक झाल्यावर एखाद्या उद्योजकांशी भेट घेणार असाल तर त्या व्यक्तीशी बोलून त्यांची वेळ निश्चित करावी. उपक्रमांची निवड करणे: (१) रुमालावर टाके टाका. (उलटी टीप व धाव दोरा) (२) कांदे / इतर भरलेली गोणी धावदोरा शिलाईच्या प्रकाराने शिवून पहा. अपेक्षित कौशल्ये: (१) सुई धरता येणे. (२) दोरा किती घेणे याचा अंदाज येणे. (३) एका वेळेला किती टाके सुईमध्ये घ्यावे हे कळणे. विशेष माहिती : (१) धाव दोरा : (रनिंग स्टिच) : सरळ टाके जवळजवळ घातल्यास त्यांना 'धाव दोरा' म्हणतात. यासाठी सुई थोडी लांब वापरावी. नंतर कापडातून सुई बाहेर काढावी. यामुळे काम जलद होते. (२) दोऱ्याच्या शेवटी गाठ मारणे : टाके घालण्यास सुरुवात करण्यापूर्वी आकृती: अंगठ्याकडील बोटाभोवती दोन्याचे टोक गुंडाळून तेथे अंगठ्याच्या साहाय्याने गाठ मारावी म्हणजे कापडातून दोरा निसटत नाही. अतीतलम कापडावर टाक्यासाठी अशी गाठ मारल्यास इस्त्रीने हे कापड खराब होण्याची भीती असते. शिवणकाम पूर्ण झाल्यावर पुन्हा अंगठ्याच्या साहाय्याने गाठ मारावी. धाव दोरा २१