Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• A रक्तगटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींवर A अँटिजेन वप्लाझमामध्ये Bअँटिबॉडी असतात. B रक्तगटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशीवर B अँटिजेन व प्लाझमामध्ये A अँटिबॉडी असतात. AB रक्तगटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींवर A व B दोन्ही अँटिजेन असतात वप्लाझमामध्ये A व B दोन्ही अँटीबॉडी नसतात. ० रक्तगटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींवर A व B दोन्ही अँटिजेन नसतात व प्लाझमामध्ये A वB दोन्ही अँटिबॉडी असतात. रक्तगट कसा सांगतात? रक्तगट सांगताना A, B, AB किंवा ० यापैकी एखादा रक्तगट व Rh पॉझिटीव्ह किंवा Rh निगेटिव्ह यापैकी एक Rh फॅक्टर अशा दोन बाबी एकत्रितपणे सांगतात. उदा.A+ve, B-ve,AB-ve,O+ve वगैरे. Rh फॅक्टर म्हणजे काय ? -हीसस (Rhesus) जातीच्या माकडाच्या रक्तातील तांबड्या पेशींवर एका विशिष्ट प्रकारचे अँटिजेन असते. तेच अँटिजेन काही माणसांच्या रक्तातील तांबड्या पेशींवरसुद्धा सापडते. अशा माणसांचे रक्त Rh+ve आहे असे म्हणतात. ज्यांच्या रक्तातील तांबड्या पेर्शीवर हे अँटीजेन सापडत नाही. त्यांचे रक्त Rh-ve आहे असे म्हणतात.Rh+ve रक्ताच्या माणसांना Rh-ve रक्त दिलेले चालत नाही. रक्तगट तपासणीचे फायदे : कोणत्याही व्यक्तीस रक्त देण्याची गरज पडते तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तगटाचेच रक्त देणे आवश्यक असते. रक्तगट सांगताना रक्तगट आणि Rh फॅक्टर या दोन्ही गोष्टी सांगणे आवश्यक आहे. उदा. A+ve रक्ताच्या व्यक्तीला A-ve रक्त दिलेले चालत नाही. रक्तदानाबद्दल माहिती : पेशीयुक्त द्रवपदार्थामुळे रक्त बनलेले असते. या पेशी म्हणजे लाल पेशी (RBC) व पांढऱ्या पेशी (WBC) व प्लेटलेटस् (Platelets) रक्ताच्या एकूण आकारमानापैकी ४५% असतात. उरलेला द्रव भाग हा प्लाझ्मा असतो. विविध रुग्णांच्या गरजेनुसार दान केलेल्या रक्ताचे वेगवेगळ्या घटकांमध्ये वर्गीकरण करता येणे शक्य आहे. लाल रक्तपेशी या शरीरात प्राणवायू पुरवितात व कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून टाकतात. त्यांच्या योग्य त्या कार्यासाठी लाल रक्तपेशींचे नीट पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण पदार्थ म्हणजे लोह, प्राण्यांचे मांस, काळीज, अंडी, हिरव्या पालेभाज्या इ.पासून मिळू शकते. लाल रक्तपेशी या बोन मॅरोमध्ये तयार होत असतात व त्यांच्या निर्मितीचा सामान्य दर हा १७ दशलक्ष पेशी प्रती सेकंद असतो. रक्त प्रवाहातील पांढऱ्या पेशी या संरक्षक पेशी असतात. त्या सूक्ष्म जंतुंवर (बॅक्टेरिया) सूक्ष्म धमन्यामधून जाऊन हल्ला करतात व त्यांचा नाश करतात. पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा Platelets प्लेटलेटस् तयार करतात. ज्या रंगहीन पेशी असतात व यांचा तयार होण्याचा वेग हा लाल पेशींच्या दुप्पट असतो. पांढया रक्त पेशी बोन मॅरोमध्ये मेगाकायरोसाईटस्च्या तुकड्यातून तयार होतात. मेगाकायरोसाईटस्चे मुख्य कार्य रक्तामध्ये गाठी निर्माण करून रक्तस्त्राव थांबविणे हे आहे. याशिवाय प्लेटलेटस् (Platelets) रक्तवाहिन्या लीकप्रूफ ठेवण्याचे कार्य करतात. प्लाझ्मामध्ये ९२% पाणी, ७% प्रोटीन्स, १% खनिज हार्मोन्स व असतात. प्लाझ्मा हा गॅमा ग्लोब्यूलीन, सीरम अल्ब्यूमीन, फायब्रिनोजिन व गाठी निर्माण करणाऱ्या घटकांचा स्त्रोत आहे. रक्तगट तपासणी उद्देश : रक्तगट तपासणी करण्यास शिकणे आणि विविध रक्तगटांची माहिती समजावून घेणे. अपेक्षित कौशल्य : दिलेल्या रक्त नमुन्याचा रक्तगट विद्यार्थ्याला निश्चित करता येणे. साहित्य व रसायने : लँसेट, कापूस, २-३ काचपट्ट्या(स्लाईडस), परीक्षानळी, सूक्ष्मदर्शक यंत्र, स्पिरीट, AntiA,AntiB,AntiD इ. १९