पान:गृह आरोग्य.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला द्रवपदार्थ आहे. रक्तगटाची तपासणी करत असताना ज्या व्यक्तीचे आपल्याला रक्त तपासणी करावयाचे आहे. त्या व्यक्तीला आपल्या विरुद्ध बाजूस घ्यावे. तसेच पहिल्यांदा टेबलवर AntiA, Anti B and Anti D असे तिन्ही लिक्विड टेबलावर एका रेषेत ठेवावे व त्याच समोर काचपट्टीवर रक्ताचे थेंब घ्यावेत व थेंब टाकल्यावर त्याच समोर ते लिक्विड ठेवावे. दक्षता : (१) एका व्यक्तीस एकच लँसेट वापरा. (२) रक्त काढताना नखाजवळ प्रिक करू नका. शेंड्यावर प्रिक करा. (३) प्रिक करण्यास डाव्या हाताचे करंगळी शेजारचे बोट घ्या.(४) प्रिक करताना तो हात खालच्या दिशेने धरा. उपक्रम :(१) रक्तगटाचा चार्ट करून तुमच्या वर्गात लावा. (२) सर्व शिक्षकांचे रक्तगट तपासा, रक्तगट तपासणे: शिक्षक कृती: (१) रक्तगटाबद्दल माहिती द्यावी. (२) रक्तगट का तपासावे याबद्दल माहिती द्यावी. (३) विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की त्या प्रश्नांचे योग्य उत्तर द्यावे, शंकानिरसन करावे. (४) विद्यार्थ्यांना रक्तगट तपासण्याचे स्वत: प्रात्यक्षिक करून दाखवावे. (५) रक्तगट तपासण्यासाठी लागणारे साहित्य टेबलवर व्यवस्थित काढून ठेवणे, (६) ज्या व्यक्तीचे रक्तगट तपासायचे आहे त्यास नीट बसवावे, त्याच्या डाव्या हातावरील करंगळी शेजारील बोट स्पिरीटने स्वच्छ पुसावे (निर्जंतुक करावे.) । तीन काचेच्या स्लाईड टेबलावर काढून ठेवणे. (८) लँसेटच्या साहाय्याने ज्या व्यक्तीचे रक्त तपासायचे आहे त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील करंगळी शेजारील बोटावर प्रिक करणे. (९) बोटातील आलेले रक्त काचेच्या दोन स्लाईडवर तीन ठिकाणी घ्यावे. (१०) काचेच्या स्लाईडवर घेतलेल्या रक्ताच्या थेंबात अॅन्टीसिरा A,Bआणि D चे तीन थेंब टाकणे. (११)काचेच्या एका स्लाईडने रक्त व अॅन्टीसिरा एकजीव करणे. (१२) एकजीव केलेल्या रक्तात रक्ताच्या गाठी तयार होतात की नाही याचे निर्देशकाने प्रथम निरीक्षण करावे व त्यानंतर विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास सांगणे. (१३)निरीक्षण करून आलेला निष्कर्ष विद्यार्थ्यांना सांगणे. (१४) रक्तगट तपासलेल्या काचेच्या स्लाईड स्वच्छ पाण्यात स्वच्छ करणे. (१५) विद्यार्थ्यांना इतर व्यक्तीचे किंवा इतर विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यास सांगणे. (१६) विद्यार्थी योग्य पद्धतीने रक्तगट तपासतील याकडे लक्ष देणे. (१७) तुमच्याकडे सर्व रक्तगटांची विद्यार्थ्याच नावानिशी नोंद करून घ्या. माहिती : अँटिजेनः .अॅट म्हणजे विरोधी प्रतिक्रिया, जेन म्हणजे निर्माण करणारा. अॅटजेन म्हणजे शरीरात अनावश्यक असलेला परका पदार्थ ज्याच्यामुळे शरीर विरोधी प्रतिक्रिया निर्माण करते. उदा. शरीराला अपाय करणारे जीवाणू शरीरात आले तर शरीर त्याला नष्ट करण्यासाठी काही विरोधी प्रतिक्रिया निर्माण करते. तसेच, निसर्गतः रक्तातील तांबड्या पेशींवर काही अँटिजेन व प्लाझमामध्ये काही अँटिबॉडी असतात. अँटिजेनला नष्ट करण्यासाठी शरीर एक नवा पदार्थ निर्माण करते त्याला अँटिबॉडी म्हणतात. रक्तगट A व रक्तगट B या दोन प्रकारच्या रक्तामधील सिरम वेगळा करून तो जतन (Preserve प्रिझव्ह) केला जातो, त्याला अँटिसिरा म्हणतात, १८