पान:गृह आरोग्य.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता व काळजी: (१) कोय व सालीला असलेला गर नीट काढून घ्या, त्यात दोरे येणार नाहीत याची काळजी घ्या. (२) सोडीयम बेंझाइट हे कृत्रिम अन्नसंरक्षक सूक्ष्म जीवाणूची वाढ थांबवते. पण एक किलो गरासाठी अर्धा ग्रॅम सोडीयम बेंझाइट एवढ्याच प्रमाणात ते वापरावे; अन्यथा ते आरोग्याला हानिकारक ठरते. शक्यतो कृत्रिम अन्नसरंक्षक वापरू नयेत. वापरल्यास पॅकिंगच्या लेबलवर त्याचा उल्लेख करावा. (३) फळे चांगल्या प्रतीची घ्यावीत म्हणजे त्यांचा नैसर्गिक रंग व स्वादच आकर्षक असतो. परंतु आवश्यकता असल्यास खाण्याचा रंग व स्वादार्क (इसेन्स) वापरावा व त्याचा उल्लेख पॅकिंगच्या लेबलवर करावा. शिक्षक कृती: •आंब्याव्यतिरिक्त परिसरात उपलब्ध हंगामानुसार बोर, अंजीर, टोमॅटो, पेरू, स्ट्रॉबेरी वगैरे दुसऱ्या एखाद्या फळाचे जॅम,मुरांबे,छुदयाचे प्रात्यक्षिक ठेवावे व त्यानुसार साहित्य, कृती, दक्षता इ. मुद्द्यांमध्ये योग्य ते बदल करावेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या खर्चान कमी प्रमाणात स्वतंत्रपणे जॅम करू इच्छित असल्यास त्याला प्रोत्साहन द्या. पाककौशल्याचे गुणांकन करावे, अंतिम पदार्थाच्या उत्तम गुणवत्तेची अपेक्षा शालेय विद्यार्थ्यांकडून ठेऊ नये. कृतीची प्रवाहाकृती तयार करून वर्गात शैक्षिणिक साहित्य म्हणून वापरा. • जॅमच्या कारखान्याला भेट द्या. माहिती: •फळातील पेक्टिन-फळातील पेशी एकमेकांना जोडणारा घटक म्हणजे पेक्टिन, कच्च्या फळात प्रोटोपेक्टिन असते. जसजसे फळ पिकत जाते तसतसे प्रोटोपेक्टिनचे रूपांतर पेक्टिनमध्ये होऊन पोशीभित्ती मऊ होतात. म्हणून पिकलेल्या फळांचा गर कच्च्या फळांपेक्षा मऊ असतो. फळ खूप पिकले की पेक्टिनचे रूपांतर पेक्टिक आम्लात होते व फळ लिबलिबीत होते. जॅमसाठी पेक्टिन असलेली म्हणजेच योग्य प्रमाणातच पिकलेली फळे वापरावीत. फळे टिकवण्यासाठी सायट्रिक आम्लाचा उपयोग - सायट्रिक आम्लामुळे फळातील पेक्टिन सुटे होऊन पाण्यात उतरते व जॅम दाट होतो.तसेच साखर द्रवरूपातच राहून तिचे स्फटिक होत नाहीत. साधारणपणे १ किलो गरासाठी ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल वापरतात. •अन्नसंरक्षक म्हणजे काय? अन्नपदार्थ नासण्यापासून वाचवणारे पदार्थ म्हणजे अन्नसंरक्षक, उदा. साखर/गुळासारखे गोड पदार्थ, लिंबू/सायट्रिका आम्ल, साखर ही जलशोषक असल्यामुळे सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक असे पाण्याचे प्रमाण ती कमी करते. फळाचा प्रकार जमसाठी साखरेचे प्रमाण फळाचा प्रकार जॅमसाठी साखरेचे प्रमाण गोड गराच्या पाऊणपट आंबट गराएवढीच रसाळ गराच्या अर्धी जॅम तयार झाल्याच्या कसोट्या : पातेल्याच्या कडेपासून जॅम सुटा होऊ लागतो. चमच्यावरून जॅम खाली टाकल्यास त्याचा सुटा थेंब न पडता जीभेच्या आकारात सलग ओघळ खाली येतो, बशीत ओतून गार केल्यास त्याला पाणी सुटत नाही व ज्या आकारात ओतला त्याच आकारात राहतो, कच्च्या जॅमपेक्षा जास्त पारदर्शक दिसतो, शर्करा तापमापकामध्ये तयार जॅमचे तापमान १०२ ते १०५ अंश सेल्सिअस एवढे दाखवले जाते. १०