पान:गृह आरोग्य.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) विद्यार्थ्यांना जॅम तयार झाला आहे की नाही याच्या कसोट्या करता येणे. (४) विद्यार्थ्यांना जॅमची विक्री करता येणे. उदा. काचेच्या बाटलीत भरून त्यावर लेबल लावून शाळेतील विविध कार्यक्रमात स्टॉल उभारून विक्री करणे. (५) पाकशास्त्रातील भांडी व उपकरणे विद्यार्थ्यांना हाताळता येणे, जम करण्याच्या कृतीतील पाक कौशल्यांची ओळख होणे, विशेष माहिती: (१) जॅम दीर्घकाळ टिकवून ठेवता येतो. त्यामुळे आपण जॅम दीर्घकाळ वापरू शकतो, (२) जॅम हा गोड पदार्थ असल्यामुळे लहान मुले आनंदाने जॅमचा उपयोग दररोजच्या जेवणात करतात, दक्षता : (१) फळ चाकूने कापत असताना हाताला कापणार नाही याची दक्षता घ्यावी. (२) फळाची साले व बिया फळाच्या गरात येणार नाहीत हे पहावे. (३) फळाच्या फोडी करण्यासाठी फळ स्वच्छ पाण्यात धुवावे जेणेकरून धूळ व किटकनाशके जॅममध्ये येणार नाहीत. (४) जॅम तयार करताना साखरेचे प्रमाण योग्य असावे. (५) जमसाठी फळे कची किंवा जास्त पिकलेली नसावीत. उद्देशः अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आंबा, अननस इत्यादी परिसरातील उपलब्ध फळांपासून जॅम, मुरांबे, छंदा तयार करणे, विक्रीसाठी त्याचे योग्य वजनात पॅकींग करणे व विक्री किंमत ठरविणे. साहित्य व उपकरणे : आंबा - १२ नग (किंवा परिसरात हंगामानुसार उपलब्ध दुसरी फळे), साखर-गराच्या पाऊणपट, आवश्यकतेनुसार-खाण्याचा केशरी रंग व मँगो इसेन्स (आंब्याचा स्वादार्क), सोडीयम बेंझोइट अन्नसंरक्षक, सायट्रिक आम्ल), गॅसची शेगडी किंवा रॉकेल स्टोव्ह, मिक्सर किंवा पल्पर, वजनकाटा, शर्करा तापमापक, स्टेनलेस स्टीलचे मोठे भांडे / पातेले, जाड बुडाचे पातेले, पकड/सांडशी, लाकडी चमचा, ताटली, स्टेनलेस स्टीलची किंवा प्लॅस्टिकची मोठी गाळणी, सोलणे, स्टेनलेस स्टीलची सुरी, फळे कापण्यासाठी लाकडी पाट किंवा बोर्ड, मेणकागद किंवा पॅराफिन मेण, काचेच्या बरण्या/बाटल्या. कृती :(9) उत्तम प्रतीचे १२ आंबे घेऊन त्याची देठाकडची बाजू थोडी कापून टाका, देठाजवळचा थोडा चीक काढून टाका व नंतर आंबे स्वच्छ धुवून घ्या. सर्व उपकरणे स्वच्छ धुवून घ्या. (२) स्टेनलेस स्टीलच्या मोठ्या पातेल्यात आंब्याचा गर काढून घ्या. (३) विद्युत मिक्सर /पुरणयंत्र /पल्पर वापरून सर्व गर एकसारखा करून घ्या. गराच्या गाठी असू नयेत. मोठी वाटी/कप वापरून गर मोजून जाड बुडाच्या पातेल्यात घ्या व त्याच्या पाऊणपट साखर गरामध्ये मिसळा. उदा.१२ कप गर असल्यास ९ कप साखर घ्यावी. आवश्यक असल्यास योग्य प्रमाणात कृत्रिम अन्नसंरक्षक, खाण्याचा रंग, स्वादार्क, सायट्रिक आम्ल इ. घटक घाला, गरामध्ये सर्व घटक एकजीव करा, गॅसच्या शेगडीवर / स्टोव्हवर जाड बुडाचे पातेले ठेऊन मंद आचेवर, लाकडी चमच्याने सतत ढवळत राहा व मिश्रण शिजवून घ्या. जॅम तयार झाल्याच्या कसोट्यांचा उपयोग करून जॅम शिजल्याची खात्री करून घ्या. साठवणीच्या बरण्या किंवा बाटल्या आतून स्वच्छ व कोरड्या करून घ्या व जॅम साधारण गरम असतानाच त्यात भरा. (८) जम गार झाल्यानंतर बरण्याची झाकणे लावा व मेणकागद /मेण वापरून झाकण्यांच्या कडा हवाबंद करा, (९) निर्मितीचा दिनांक, वापराची अंतिम मुदत, कृत्रिम घटक घातले असल्यास त्यांची नावे व प्रमाण, पत्ता, किंमत इ. कायदेशीर माहितीचे लेबल प्रत्येक बरणीवर लावा.