पान:गृह आरोग्य.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ड) वाढलेला मुक्त चुना कमी करण्यासाठीचे उपाय (चुनखडीयुक्त जमिनीसाठी): (१) चुना कमी करण्यासाठी ताग, धैंचा, शेवरी यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत. (२) साखर कारखान्यातील मळी किंवा काकवी एकरी ५ टन प्रमाणे लागवडीपूर्वी तीन महिने अगोदर घालावी. (३) सुपर फॉस्फेटची खते देतेवेळी ते थेट जमिनीत न देता कंपोस्ट/शेणखतात मिसळून एकाआड एक द्यावे. ४) जर ऊस पिवळा पडत असेल तर एकरी २२ किलो फेरस सल्फेट ५-१० गाड्या कंपोस्ट अगर शेणखतात मिसळून द्यावे. अथवा फेरस सल्फेटचे द्रावण फवारावे. (१ कि.हिरा /अमोनियम सल्फेट १०० लीटर पाण्यातून फवारावे.) फेरस सल्फेट पाण्यातून द्यावयाचे असल्यास दोन तीन वेळा १-१ महिन्याच्या अंतराने द्यावे, दरवेळी ४ ते ५ किलो फेरस सल्फेट वापरावे. निरनिराळ्या पिकांची क्षारसहनशीलता: (१) बार संवेदनशील पिके : तीळ, वाटाणा, तूर, मुळा, चवळी, घेवडा, भेंडी, कोबी, रताळी, संत्री, लिंबू, मोसंबी, आंबा इ. (२) मध्यम क्षारसहनशील पिके : भात, ज्वारी, गहू, बाजरी, मका, मोहरी, करडई, एरंडी, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, गाजर, वाटाणा, लसूण, काकडी इ. (३) पिकाची लागण सरीच्या कुशीत करावी. (४) क्षारास दाद देणारी पिके घ्यावीत व पिकांची नियमित योग्य अंतरावर फेरपालट करावी. (५) जास्त प्रमाणात सेंद्रिय खते व हिरवळीची खते वापरावीत. (६) जमिनीत योग्य अंतरावर चर खणून निचरा वाढल्यास माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा ठरवून त्याचा वापर करावा. (७) पिकास योग्य वेळी थोडे थोडे पाणी द्यावे. (८) पाण्याच्या वापराने क्षाराचे प्रमाण वाढल्यास माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा ठरवून वापर करावा. (९) चांगल्या व मचाळ(दूषित/गढूळ) पाण्याचा एकत्रित वापर करावा. फवारणीसाठी आवश्यक असलेल्या क्षमतेचे द्रावण तयार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे पिकपद्धती: क्र. द्रावणात खताच्या ४०० लीटर फवारणीसाठी तीव्रतेची टक्केवारी लागणारी खताची मात्रा (किलो) शेरा 9 ०.५ ०२ एका फवारणीसाठी २ १.० ०४ ४०० लीटर द्रावण १.५ ०६ आवश्यक आहे. २.० 90 ५ २.५ १२ वर्षाच्या कालावधीत खालील पैकी तीन ते चार पिके फेरपालटीने घेणे फायदेशीर असते. ८१