पान:गृह आरोग्य.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. ९) तांबे (Cu): लक्षणे : कोवळ्या पानांमध्ये (शिरा) हरित द्रव्याचा अभाव दिसतो. तसेच पाने पिवळी होऊन त्याची वाढ खुंटते व नंतर ती गळून पडतात. पानाच्या तळाकडील भाग हिरवा राहतो. उपाय : कॉपर सल्फेटची १% फवारणी करा/१० ते १२ किलो हेक्टरी जमिनीतून द्यावे. १०)जस्त (Zn):लक्षणे : पाने लहान होऊन शिरांचा भाग पिवळा होता. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. उपाय : झिंक सल्फेटची ०.४% फवारणी करा किंवा २५ ते ३० किलो/हेक्टरी जमिनीतून द्यावे. ११)बोरॉन (B) : लक्षणेः नवीन पालवी देठाकडून फिक्कट होऊ लागते. पाने दुमडतात. अंकुर मरू लागतात. पानावर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात.फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. उपाय : ०.५% बोरोट किंवा बोरॉक्स पानावर फवारावे. १२)मॉलिब्डेनम(Mo) : लक्षणे : जुन्या पानांवर पिवळे, नारंगी ठिपके पानभर दिसून येतात. शिरा फिक्कट हिरव्या राहतात. नवीन पाने सुरुवातीस हिरवी दिसतात.पण वाढ झाल्यानंतर पाने पिवळी पडून आतील बाजूस वळतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो. उपाय : ०.२% सोडियम मॉलिब्डेट पानावर फवारावे किंवा हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम सॉलिब्डेट जमिनीतून द्यावे. अ) वाढलेला विम्ल निर्देशांक कमी करण्यासाठी उपाय (खारवट/चोपण जमिनीसाठी) (१) जमिनीचा चोपणपणा वाढत आहे. त्यासाठी उतारास समांतर चर काढून पाण्याचा निचरा होईल अशी काळजी घ्यावी. (२) हेक्टरी ५ ते १० टन जिप्सम पूड व १५ ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घालावे. साखर कारखान्याच्या मळीच्या (प्रेसमड) १५ ते २५ गाड्या जमिनीत मिसळावीत. (३) हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा, शेवरी यासारखी पिके घेऊन फुलावर येताच जमिनीत सोडावीत. (४) भात, कापूस, गहू, धैंचा, शेवरी यांसारखी पिके घ्यावीत. वाढलेले क्षार कमी करण्यासाठी उपाय : (१) जमिनीच्या पृष्ठ भागावर आलेले क्षार खरवडून शेताबाहेर टाकून द्यावेत. (२) जमिनीचे लहान लहान तुकडे करून त्यात थोडा वेळ वाफा भरून पाणी साठवून एकदम चरावाटे बाहेर काढून टाका. म्हणजे पाण्याबरोबर क्षार बाहेर जातील. चर खणून पाण्याच्या निचऱ्याची चांगली सोय करावी. (४) गावखते (सेंद्रिय खते) भरपूर प्रमाणात वापरावीत. (५) हिरवळीच्या खतांसाठी धैंचा, शेवरी, ताग यांसारखी पिके घेऊन फुलावर येण्यासाठी जमिनीत गाडावीत. क्षारास दाद देणारी पिके : कांदा, भात, कापूस, गहू, सूर्यफूल, शेवरी यांसारखी घ्यावीत. (७) हेक्टरी ५ ते १० टन जिप्सम पूड व ३० ते ५० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घालावे / साखर कारखान्यातील मळीच्या (प्रेसमड) २५ ते ३० बैलगाड्या घालाव्यात. कमी झालेले आम्ल निर्देशांक वाढविण्यासाठी उपाय (आम्लयुक्त जमिनीसाठी): (१) जमिनीचा सामू व पोत लक्षात घेऊन हेक्टरी ०.५ ते २.५० टन चुन्याची अगर चुनकळीचे पाणी वापरावे. (२) सेंद्रिय खतांचा व हिरवळीच्या खतांचा वापर करावा. ८०