पान:गृह आरोग्य.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय : १) नत्र (N): लक्षणे : अ) झाडे ठेंगू राहून पाने हिरवट पिवळी दिसतात. ब) खालची पाने वाळून गळतात. अतिरेकी अवस्थेत पानांना ज्वाळांसारखा रंग येतो. उपाय : अ) १% युरिया फवारणी करावी, ब) नत्र खतांचा जमिनीतून वापर करावा. २) स्फुरद (P): लक्षणे : अ) वनस्पतीची वाढ खुंटते ब) पानांना गडद हिरवा रंग येतो. क) पाने सरळ उभट व अरुंद दिसतात. ड) पानांच्या मागील बाजूस ब्राँझ रंग येतो. उपाय : अ) १% डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. ब) स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा, ३) पालाश (K):लक्षणे : अ) पानांचा टोकाकडील व कडेचा हिरवा रंग जाऊन पिवळसर लाल रंग येतो. पण मधील भाग हिरवाच राहतो. ब) पानांच्या कडा वरून खाली वाळतात. लहान लहान करपलेले ठिपके दिसतात. क) अतिरेकी अवस्थेत पाने वेडीवाकडी होतात. उपाय : अ) ५% सल्फेट ऑफ पोटॅशची किंवा १.२% पोटॅशियम क्लोराईड पानात फवारावे. ब) म्युरेट ऑफ पोटॅश जमिनीतून द्यावे. ४) कॅल्शियम (Ca):लक्षणे :अ) वनस्पती गडद हिरवी दिसते, पण नवीन पालवीत हरितद्रव्यांचा अभाव दिसतो. ब) पालवी वाळते व मरते. उपायः अ) कॅल्शियम सल्फेटची २% फवारणी करावी. ब) ०.५% कॅल्शियम क्लोराईड पानावर फवारावे ५) मॅग्नेशियम (Mg): लक्षणे : अ) पानांच्या कडांकडून हरितद्रव्यांचा व्हास होतो. ब) पानांच्या शिरा हिरव्या दिसतात. क) पाने कडेला व देठाजवळ मुरडलेली दिसतात. अतिरेकी अवस्थेत पानावर करपलेले ठिपके दिसतात. पाने सहजरित्या गळून पडतात. उपाय : मॅग्नेशियम सल्फेटची ०.५% फवारणी करावी. ६) गंधक (S): लक्षणे : पाने हिरवी असतात पण शिरा फिक्कट असतात. पानावर करपलेले ठिपके असतात. उपाय : गंधकाची २% फवारणी करावी वा हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमिनीतून द्यावे. ७) लोह (Fe): लक्षणे : पानात हरितद्रव्यांचा अभाव तसेच मुख्य शिरा हिरव्या असतात. पानांवर ठिपके नसतात. उपाय : ०.५% हिराकस (फेरस सल्फेटची फवारणी करा किंवा जमिनीतून २५ ते ३० किलो /हेक्टरी करणे.) ८) मँगेनीज(Mn): लक्षणे : पानात हरितद्रव्याचा अभाव तसेच मुख्य व लहान शिरा हिरव्या, त्यामुळे पानावर चौकटीदार नक्षी दिसते. उपाय : मँगेनिज सल्फेटची ०.२५% फवारणी करा किंवा १० ते २५ किलो/हेक्टरी जमिनीतून द्यावे ७९ .