wo अ.नं. पिकाचे नाव रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (किलो/हेक्टरी) नत्र स्फुरद पालाश ड. | संयुक्त खते- १. नायट्रो फॉस्फेट (पोटॅशसह) ग्रेड-१ १८ १८ २. नायट्रो फॉस्फेट (पोटॅशसह) ग्रेड-२ १५ १५ १५ ३. डायअमोनियम फॉस्फेट १८ ४६ ४. सुफला (नायट्रो-फॉस्फेट) २० २० ५. भगीरथ १८ १८ १० संपूर्णा १९ १९ १९ माती परीक्षणावर आधारित खतांच्या मात्रा ठरविणे : आता आपण एक उदाहरण घेऊन खतांच्या मात्रा कशा प्रकारे ठरविता येतील ते पाहूया. उदा.:श्री. आनंदराव यांना चार हेक्टर बागायती गव्हाचे पीक घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांना किती व कोणती खते घ्यावी लागतील हे आपण पाहूया. हिशोब समजण्यास सोपे व्हावे म्हणून सरळ खतेच (उदा. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट) बाजारात उपलब्ध आहेत असे समजूया. उत्तर : आनंदरावांच्या शेतीच्या मातीचा परीक्षण अहवाल खालील प्रमाणे आहे. नत्र १५० किलो/हे. स्फुरद १८ किलो/हे. पालाश २८० किलो/हे. तक्ता क्र.१ मधील सहास्तरीय वर्गवारीप्रमाणे या मातीची वर्गवारी खालीलप्रमाणे ठरेल. -कमी, स्फुरद - मध्यम, पालाश-भरपूर तक्ता क्र.२ प्रमाणे बागायती गव्हासाठी खालीलप्रमाणे अन्नद्रव्यांची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस 'मध्यम' या सहास्तरीय वर्गवारीसाठी लागू आहे. म्हणजेच माती परीक्षण अहवालाप्रमाणे जर सर्व अन्नद्रव्ये मध्यम या वर्गवारीमध्ये असती तर खालीलप्रमाणे अन्नद्रव्ये खतामधून द्यावी लागली असती. नत्र १२० किलो प्रति हेक्टर, स्फुरद ६० किलो प्रति हेक्टर, पालाश ६० किलो प्रति हेक्टर परंतु माती परीक्षण अहवालाप्रमाणे नत्र - कमी, स्फुरद - मध्यम आणि पालाश – भरपूर आहे. त्यामुळे खतांची द्यावयाची मात्रा (तक्ता क्र.३ च्या शिफारशीप्रमाणे) खालील प्रमाणे : नत्र -१२०+२५% = १२०+३० = १५०कि./हे स्फुरद ६० =६० कि./हे. पालाश ६०-२५% ६०-१५ =४५ कि./हे चार हेक्टर पिके घेण्यासाठी एकूण अन्नद्रव्ये खालीलप्रमाणे लागतील. नत्र-१५०x४६०० किलो, स्फुरद-६०x४ = २४० किलो, पालाश-४५४ ४ = १८० किलो विविध रासायनिक खतामधील शेकडा प्रमाण दिलेल्या तक्ता नं.४ प्रमाणे युरियामध्ये ४६.६ टक्के नत्र आहे. म्हणजे १०० किलो युरियामध्ये ४६.६ किलो नत्र आहे. चार हेक्टर पिकांसाठी ६०० किलो नत्र हवे आहे. म्हणजेच ६००x१०० = १२८८ किलो युरिया. म्हणजेच एकूण १२८८ किलो युरिया लागेल. ४६.६ नत्र- ७७
पान:गृह आरोग्य.pdf/७८
Appearance