पान:गृह आरोग्य.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मातीचा नमुना माती परीक्षणासाठी तयार करणे : मातीचा नमुना घेतल्यानंतर त्याचे पृथःक्करण करण्याअगोदर त्यावर काही प्रक्रिया करावी लागते. जेणेकरून नमुना तपासणीस योग्य बनतो. सावलीत वाळवलेला मातीचा नमुना लाकडी खलात (Wooden Morter) हलकेपणे कुटून घ्यावा व त्यातील वनस्पतीचे अवशेष, खड्डे व इतर अनावश्यक बाबी काढून टाकाव्यात. कुटलेला नमुना दोन मिलीमीटरच्या चाळणीने चाळून घ्यावा. अशाप्रकारे तयार केलेला नमुना सामू, नत्र, स्फुरद आणि पालाश या घटकांच्या तपासणीसाठी वापरावा, सेंद्रीय कर्ब (Organic Carbon) या घटकाच्या तपासणीसाठी अत्यल्प वजनाचा नमुना लागतो. वरील तयार केलेला नमुना पुन्हा लाकडी खलात कुटावा व अर्धा मिलीमीटर (0.5 mm.) चाळणीतून चाळून घ्यावा. असा एकदम बारीक नमुना सेंद्रीय कर्ब तपासणीसाठी वापरावा. माती परीक्षण संच वापरून घटक परीक्षण माती परीक्षण संच वापरून खालील घटकांचे परीक्षण- पद्धतींची पुस्तिका सोबत दिलेली आहे. (१)सामू (pH) (२) उपलब्ध नत्र (N) (३)उपलब्ध स्फुरद (P) (४) उपलब्ध पालाश (K) (५)सेंद्रीय कर्ब (OrganicCarbon) माती परीक्षण अहवालावर आधारित खताचे नियोजन : माती परीक्षणाचा मुख्य उद्देश हा जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद व पालाश) व महत्त्वाचे घटक (सामू व सेंद्रिय कर्ब) यांचे प्रमाण जाणून घेणे हा असतो. ही अन्नद्रव्ये व घटक संतुलित प्रमाणात असणे पिकांच्या चांगल्या वाढीसाठी गरजेचे असते. माती परीक्षणानंतर प्रमुख अन्नद्रव्यांचा (उपलब्ध नत्र, पालाश व स्फुरद) साठा निश्चित झाल्यावर, त्याची सहास्तरीय वर्गवारी करावी. ही वर्गवारी पुढीलप्रमाणे : अ) अत्यंत कमी, ब) कमी, क)मध्यम, ड) साधारण भरपूर, इ) भरपूर, फ) अत्यंत भरपूर अशाप्रमाणे सहा विभागात केली जाते. ही सहास्तरीय वर्गवारी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या साठ्यांचे प्रमाण दर्शवत असल्याने कोणते अन्नद्रव्य संबंधित पिकाला कमी पडते ते तात्काळ व नेमके समजते. त्यामुळे कमी असलेल्या अन्नद्रव्यांचा नेमका पुरवठा कमतरतेनुसार करता येतो. जमिनीत भरपूर प्रमाणात अगोदरच असलेल्या अन्नद्रव्यांचा खतांद्वारे अनावश्यक पुरवठा टाळता येतो. त्यामुळे खतांचा वायफळ वापर व खर्च टाळता येतो. जरुरी असलेल्या नेमक्या अन्नद्रव्यांचा योग्य व संतुलित प्रमाणात पुरवठा करून चांगले पिक घेता येते व जमिनीचा पोतसुद्धा टिकविता येतो. मुख्य मूलद्रव्यांच्या जमिनीतील उपलब्धतेप्रमाणे त्यांची सहास्तरीय वर्गवारी करण्याची शिफारस राज्यातील कृषी विद्यापीठांनी केली आहे. ती खालील तक्त्यांमध्ये दर्शविली आहे. (तक्ता क्र.१) प्रमाणानुसार सेंद्रीय कर्ब जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो प्रति हेक्टरी) वर्गीकरण टक्केवारी स्फुरद अत्यंत कमी ०.२० पेक्षा कमी १४०पेक्षा कमी ७ पेक्षा कमी १०० पेक्षा कमी कमी ०.२१ ते ०.४० १४१ ते २८० १०१ ते १५० ०.४१ ते ०.६० २८१ ते ४२० १५ ते २१ १५१ ते २०० साधारण भरपूर ०.६१ ते ०.८० ४२१ ते ५६० २२ ते २८ २०१ ते २५० भरपूर ०.८१ ते ०.१०० ५६१ ते ७०० २८ ते ३५ २५१ ते ३०० १.०० पेक्षा जास्त ७०० पेक्षा जास्त ३५ पेक्षा जास्त ३०० पेक्षा जास्त राज्यातील कृषी विद्यापीठांनी सर्वसाधारणपणे पिकांच्या वाढीसाठी, पेरणीच्यावेळी, पेरणीनंतर घ्यावयाच्या अन्नद्रव्यांचे प्रती हेक्टरी प्रमाणाची शिफारस केली आहे. त्यानुसार, सहास्तरीय वर्गवारीच्या माहितीच्या आधारे, कोणत्या अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता आहे व कृत्रिमरित्या, खतांच्या रूपाने कोणते अन्नद्रव्य द्यावे व त्याचे प्रमाण किती असावे हे निश्चित करता येते. सामू (pH) या घटकाच्या परीक्षणावरून कोणत्या प्रकारचे खत शेताला नत्र पालाश ८ ते १४ मध्यम अत्यंत भरपूर ७४