पान:गृह आरोग्य.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माती परीक्षणाची पूर्व तयारी- माती परीक्षणासाठी नमुना घेणे : माती परीक्षणाचा अहवाल अचूक येण्यासाठी मातीचा नमुना योग्य असणे अत्यंत जरुरी आहे. मातीचा नमुना जमिनीचा प्रातिनिधिक असावा. मातीचा नमुना योग्य नसल्यास माती परीक्षणाचा दर्जा कमी होतो. (अ) माती परीक्षण केव्हा करावे? कोणतेही पीक घेण्याअगोदर शेतातील मातीचे परीक्षण करावे. (ब) मातीचा नमुना केव्हा घ्यावा ? माती परीक्षणासाठी नमुना घेण्याची योग्य वेळ म्हणजे शेतात पीक नसताना, पेरणीपूर्वी/शेणखत वा रासायनिक खते देण्यापूर्वी नमुना घ्या. (क) नमुना शेतात कुठे घ्यावा ? जमिनीचा प्रातिनिधिक नमुना घेताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात. जमिनीचा रंग, उंच-सखलपणा, निचरा व पोत पहावा. तसेच चोपण, पाणतळ भाग, जिरायत व बागायती पिके याचा विचार करावा. जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार शेतातील मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करावेत, सर्वसामान्यपणे एकसमान मग दूरच्या भागातून १० ते १५ नमुने घ्यावेत. नमुना घेण्यासाठी जमिनीच्या भागाची निवड झाल्यावर त्यावर नागमोडी काल्पनिक रेषा काढावी व त्या रेषेवरील वेगवेगळ्या ठिकाणचे एकूण भागातील १० ते १५ नमुने घ्यावेत. अशाप्रकारे घेतलेले नमुने एक करून एक नमुना तयार करावा. शेतातील जनावरे बसण्याची जागा, शेणखत साठवण्याची जागा, पाणथळ जागा वगैरे ठिकाणी नमुना घेण्याचे टाळावे. (ड) मातीचा नमुना जमिनीच्या किती खोलीवर घ्यावा ? तृणधान्यासाठी नमुना १५ सें.मी.पर्यंतच्या खोलीवरचा घ्यावा. मुळे खोलवर जाणाऱ्या पिकासाठी (उदा. ऊस, कापूस वगैरे) नमुना १५ ते ३० सेंमी खोलीपर्यंत किंवा जरूर वाटल्यास ६० सें.मी. पर्यंत खोलीवरचा घ्यावा. नमुना जमा करण्यासाठी खताच्या पोत्याचा वापर करू नये. (इ) शेतातून घेतलेल्या अनेक नमुन्यांपासून माती परीक्षणास प्रातिनिधिक छोटा नमुना कसा तयार करावा? एकसारख्या शेताच्या जमिनीतून जमा केलेले १०-१५ नमुने घमेल्यात एकत्र करून चांगले मिसळावेत. व्यवस्थित मिसळलेली अशी सर्व माती स्वच्छ करून कापडी किंवा प्लास्टीक गोणपाटावर गोलाकारामध्ये पसरावी. पसरलेल्या गोलाकाराचे चार समान भाग पाडावेत. समोरासमोरील दोन भाग काढून बाजूला करावेत व उरलेले भाग परत चांगले एकत्र मिसळावेत. पुन्हा या एकत्र केलेल्या मातीचा वरीलप्रमाणे चौभागणी करावी व दोन भाग बाहेर काढावेत. अशी चौभागणी अंदाजे अर्धा ते एक किलो नमुना माती शिल्लक राहीपर्यंत करीत जावे. शेवटी राहिलेला अंदाजे अर्धा ते एक किलो नमुना स्वच्छ कापडी पिशवीत साठवावा. नमुना पिशवीला, शेतकन्यांचे नाव, गाव, तालुका, शेताचा नंबर, अगोदर घेतलेले पिक व पुढील पिकाचे नाव इत्यादीचे लेबल लावावे. मातीचा नमुना कसा घ्यावा : (१) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी (सेंद्रीय व रासायनिक खते देण्यापूर्वी) व खते घातल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा, २) मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत/जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे १ ते २ हेक्टरचे वेगवेगळे भाग पाडावेत. प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक किंवा वरील भाग २ हेक्टरपेक्षा मोठे असल्यास त्याचे सारखे भाग करावेत. फारच लहान भाग पाडू नयेत. खालील ठिकाणाहून मातीचे नमुने घेऊ नयेत : (१) गुरे बसण्याची व झाडाखालची जागा (२) खते व कचरा टाकण्याची जागा (३) दलदल व धराजवळील जागा (४) पाण्याच्या पाटाखालील जागा ७२