पान:गृह आरोग्य.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळून अधिक पैसा मिळविण्यास शेतीमध्ये अनेक रासायनिक खते वापरून पीक घेऊ लागला. पण रासायनिक खते शेतात माणूस जास्त वापरू लागला, त्यामुळे उत्पादनात तर थोड्या प्रमाणात वाढ तर झाली. परंतु ज्या प्रमाणात शेतजमिनीचा पोत सुधारणे आवश्यक आहे त्या प्रमाणात शेतजमिनीचा पोत सुधारला नाही. परंतु शेतजमीन ही नापीक होऊ लागली व यामुळे माती परीक्षण केले पाहिजे ही संकल्पना पुढे आली. माती परीक्षण म्हणजेच जमिनीमध्ये पिकाच्या वाढीस आवश्यक घटक किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे तपासणे, तसेच जर काही घटक कमी प्रमाणात असतील तर कोणती पिके घेतली पाहिजेत हे आपल्याला माती परीक्षणानेच समजते. पूर्व तयारी : (१) माती परीक्षण कीटमधील सर्व रसायने आहेत ना हे तुम्ही पाहून ठेवणे. (२) माती परीक्षण करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याला विचारून त्याच्या शेतातील मातीचा नमूना घ्या. शिक्षक कृती: (१) माती परीक्षणाबद्दल माहिती मुलांना द्या. (२) माती कशा प्रकारे गोळा करायची हे मुलांना फळ्यावर चित्र स्वरूपात सांगा. (३) माती गोळा करण्यासाठी कोणकोणती हत्यारे वापरतात हे सांगा, (४) आता मातीचा सँपल घेण्यास लागणारे साहित्य घेऊन शेतात जा. (गोणपाट, खोरे, कुदळ, सॉईल आगार) (५) तुम्ही एक सँपल घेऊन विद्यार्थ्यांना दाखवा व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (६) १५ विद्यार्थ्यांच्या गटाचे विभाजन ३ विद्यार्थ्यांचे गट करा व प्रत्येक विद्यार्थ्यास सँपल घेण्यास सांगा. (७) सर्व सँपल गोळा करून सावलीत सुकण्यास ठेवा. (८) आता त्या सँपल मधून तुम्हाला घ्यावयाचा सँपल कसा घ्यावयाचा हे मुलांना एकदा करून दाखवून त्यांना करण्यास सांगा. (९) आता तयार झालेले १/२ किलो सँपल तुम्ही माती परीक्षणासाठी घ्या. (१०) आता १५ विद्यार्थ्यांचे दोन गट करून एका गटास पॅक्टीकल करण्यास द्या व दुसऱ्या गटाबरोबर तुम्ही चर्चा करा व त्यांनी माती कशी गोळा केली हे त्याच्या पॅक्टीकल वहीत लिहिण्यास सांगा. (११) जो गट ग्रॅक्टीकल करत आहे त्या गटाला तुम्ही एक पॅक्टीकल करून दाखवा. नंतर त्यांना करायला सांगा व तुम्ही निरीक्षण करा. (१२) येणारे रिपोर्ट तुम्ही स्वतः चेक करून पडताळा. (१३) अशा प्रकारे दोन्ही गटाचे पॅक्टीकल पूर्ण करा, (१४) आलेला रिपोर्ट त्या शेतकऱ्याला द्या व तुमच्या वहीत ही नोंद करा व मुलांच्या वहीत नोंद करायला सांगा. उपक्रमाची निवड : शेतकऱ्याच्या शेतावरच जाऊन तेथेच माती परीक्षण करून देणे. अपेक्षित कौशल्ये : (१) PH व NPK म्हणजे काय व त्याचे कार्य काय हे विद्यार्थ्यांना समजणे, (२) विद्यार्थ्यांना माती परीक्षणाबाबत सर्व गोष्टी समजणे व इतरांना त्याचे महत्त्व समजावून सांगता येणे. विशेष माहिती : (१) माती परीक्षणाची पूर्व तयारी : मातीचा नमुना घेणे. (२) माती परीक्षण संच वापरून मातीचे परीक्षण (३) माती परीक्षण झाले - अहवालावर आधारित खताची मात्रा निश्चित करण्याची पद्धत. दक्षता :(१) किट हाताळताना मातीमध्ये रसायने सांडणार नाही ही काळजी घ्या. (२) ज्या ठिकाणी ट्रापर वापरण्यास सांगितला आहे त्या ठिकाणी ट्रापर वापरा. अॅसीड हाताळताना गोंगाट करू नये. तसेच धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. (४) पुस्तकात दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करा. माती परीक्षणापूर्वी व माती परीक्षण झाल्यानंतर: (अ) माती परीक्षणाची पूर्वतयारी - मातीचा नमुना घेणे. (ब) माती परीक्षण संच वापरून मातीचे परीक्षण. (क) माती परीक्षण झाले - अहवालावर आधारित खताची मात्रा निश्चित करण्याची पद्धत संदर्भ : आयबीटी शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी, पान नं.२३० ते २३५, ७१