Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टेबल: (७) अंगुस्तान : हातशिलाईचे काम करताना याचा उपयोग होतो. हे अंगुस्तान अंगुस्तान उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालतात. कारण हातशिलाई करताना सुईचे| नेढे मधल्या बोटाला सारखे टोचत असते. अंगुस्तान अनेक धातूंनी बनविलेले असतात. अंगुस्तानचे २ प्रकार आहेत. १) बंद तोंडाची अंगुस्ताने, २)उघड्या तोंडाची अंगुस्ताने. उपयोग : १) सुई बोटांना टोचत नाही, २) सुई भराभर ढकलली जाऊन शिलाई लवकर होते (८) टेबल : या टेबलाची उंची कमरेइतकी असते. त्यावर मेल्टन अगर बनातचे कापड घातलेले असते. प्रत्यक्ष कर्तन करण्यापूर्वी आकृती वळणदार व निर्दोष यावी म्हणून ती घटवावी लागते. त्यासाठी आकृती टेबलाचा उपयोग होतो. (९) मेझर टेप : (मापक फीत) - मापे घेण्यासाठी मेझर टेपची आवश्यकता असते. मेझर टेपची लांबी १५३ सें.मी. असून रुंदी २ सेंमी. असते. या टेपच्या एका बाजूला ७ सेंमी आणि दुसऱ्या बाजूला दोन ते अडीच सें.मी. पितळी पट्टी मेझर टेप: असते. त्यामुळे टेप फाटू शकत नाही. रुंद पितळी पट्टीच्या बाजूने टेप गुंडाळून ठेवता येतो. डीन कंपनीचा टेप उत्कृष्ट असतो. TAILORS (१०) शिंप्याचे खडू : कर्तनापूर्वी कापडावर आकृती काढण्यासाठी व शिंप्यासाठी | खास खडू तयार केले जातात. त्याला इंग्रजीमध्ये टेलर्स चॉक म्हणतात. आकृती टेबलावर कपडा बेतताना या खडूचा वापर करतात. खडू चपटे, साधे मेणयुक्त व विविध रंगाचे CHOCK असतात. (११) टेलर स्क्वेअर- हे काटकोन अनेक प्रकारचे असून लाकडी व विविध धातुंचे असतात. कापडावर मापताना या काटकोनाचा वापर करतात. (१२) प्लॅस्टिक पट्टी - इलॅस्टिक कार्डबरोबर ही पट्टी मिळते. हिचा उपयोग नेफ्यामध्ये इलॅस्टिक व नाडी ओवण्यासाठी होतो. (१३) ब्रश - आकृती टेबलावर आकृती घटवली जाते. त्यावेळी त्यामध्ये निर्माण झालेले काही दोष पुसावयाचे असल्यास ब्रशचा उपयोग होतो. (१४) ब्राऊन पेपर - हा कागद चिवट असतो. । सहजासहजी फाटू शकत नाही. या कागदाचा वापर केल्यामुळे १) कापड कापण्यास चुकत नाही. २) कापडावर खुणा होऊन ते खराब होण्याची भीती नसते. ३) काटकसरीने कापड वापरून कपडा शिवता येतो. ४) हवी तेवढी शिलाई, माया ठेवता येते. ५) कर्तनकामाचा सराव होऊन ते अधिक सुबक बनते. ६) पॅटर्न कापून ठेवून वेळेची बचत करता येते. दिवस : नववा प्रात्यक्षिक : माती परीक्षण करणे. पी.एच. व एन.पी.के.चे प्रमाण मोजणे. प्रस्तावना : भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिले जाते. पूर्वी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जात असे. कारण शेतीकडे कमाई झाली पाहिजे या दृष्टीने पाहिले जात नसे. परंतु जसजशी लोकसंख्या वाढली तसतशी शेतीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर भर पडू लागला. परिणामी माणूस शेतीतून जास्त उत्पादन ७०