पान:गृह आरोग्य.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुया: . रॉकेलमुळे यंत्रातील भागांचा तेलकटपणा कमी होवून घर्षणामुळे यंत्राचे भाग लवकर झिजतात. (४) शिवणकाम झाल्यानंतर यंत्राला आवरण घालून ठेवावे म्हणजे धूळ, माती, पाण्याचे थेंब इत्यादी यंत्राला लागून शिवणयंत्र खराब होत नाही. (५) शिवणयंत्राचा कोणताही भाग नादुरुस्त झाल्यास/झिजल्यामुळे आवाज येत असल्यास ताबडतोब नवीन भाग बसवावा. शिवणकामासाठी आवश्यक साहित्य व साधनांची माहिती : (१) सुया : या दोन प्रकारच्या असतात. (१) मशीनची सुई (२) हातशिलाईची सुई. १) मशीनची सुई : ही सुई वरच्या बाजूला फुगीर असते. खालच्या बाजूला निमुळती झालेली असते. सुईच्या वरची एक बाजू गोल व एक बाजू चपटी असते. या सुया जाड, मध्यम व बारीक आकारात मिळू शकतात. सुयांचे नंबर ९ ते २१ पर्यंत असतात. सुईचा नंबर जितका कमी तितकी सुई बारीक असते. दोरा : २) हातशिलाईची सुई : सुईचा क्रमांक जितका कमी तितकी सुई जाडीला जास्त असते. काजे, बटण, हुक्स लावण्यासाठी व काही विशिष्ट कपड्यांना हातशिलाई करण्यासाठी (उदा. ब्लाऊजची बाही, काजपट्टी इ.) ही सुई वापरावी. (२) दोरा : सुई इतकीच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवणकामासाठी लागणारा दोरा. दोराही निरनिराळ्या नंबरचा असतो. दोऱ्यांचा नंबर १० नंबरपासून १५० नंबरपर्यंत असतो.१५० नंबरचा दोरा सर्वात जाड असतो. नेहमीच्या शिवणकामात १० नंबरपासून ६० नंबरपर्यंत दोरा वापरला जातो. दोरे विविध रंगांचे व कंपन्यांचे मिळतात. रेशमी, तागी, रूपेरी, सोनेरी वर्खाचा दोरासुद्धा वापरला जातो. (३) कात्री (कापड बेतण्यासाठी) : ही कात्री बरीच मोठी असते. कात्री २५ लांबीपर्यंतची मिळते. जाड कापडावर कर्तन करायचे असेल तर ३० सें.मी. लांबीची कात्री वापरतात. या कात्रीची रचना इतर कात्र्यांपेक्षा थोडी वेगळी असते. या कात्रीला दोन रिंगणे असतात. गोल व दुसरे लंबवर्तुळाकार असते. ही कात्री लोखंडी व पोलादी असते. (४) शिवणकात्री : ही कात्री कर्तन कात्रीप्रमाणाचे असते. मात्र हिचा दोन्ही रिंगणे १५ ते २५ सेंमी. असून गोलाकार असते. या कात्रीला दोन पाती असून ती स्क्रूने जोडलेली असतात. ही कात्री मशीनवर वापरण्यासाठी असते. (५) दोरे कापण्याची कात्री : या कात्रीचा आकार एखाद्या बंद चाकूसारखा असतो. याची एक बाजू रुंद व दुसरी बाजू अरुंद असते. ही कात्री स्टीलची असून लांबी १२ सेंमी. असते. या कात्रीचा उपयोग काही कच्च्या शिवणीचे धागे शिवणीत अडकून राहतात, ते अर्धवट राहिलेले धागे कापण्यासाठी करतात. (६) इस्त्री : कपडा बेतण्यापूर्वी कापड चुरगळलेले असेल तर इस्त्री करून घ्यावी लागते. कापडाला चुण्या पडलेल्या असतील तर कापड बेतताना मापात फरक होण्याची शक्यता असते. कोळशाची, विजेची, गॅसची यापैकी इस्त्री : कोणत्याही प्रकारची इस्त्री वापरून कापडावरील सुरकुत्या घालवता येतात. ३० सें.मी OD ६९