पान:गृह आरोग्य.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवणयंत्रात बिघाड होण्याची कारणे व उपाय : (१) शिवणयंत्रात वरचेवर तेल घातले नाही तर यंत्र जड जाते. त्यासाठी यंत्राला वरचेवर तेल देण्यात यावे. (२) शिवणयंत्राची वादी सैल झाली तर यंत्र बंद पडते. म्हणून याची वादी आवळून घ्यावी. घट्ट बसवावी. (३) नालेमध्ये दोरा अडकला तर यंत्र बंद पडते. यासाठी नाल स्वच्छ करावी. (४) रोलर झिजला तर यंत्र जड जाते. उपाय म्हणून रोलर बदलून घ्यावा. (५) जाड कापड(उदा. खाकी, जीन्स) शिवताना यंत्र जड जाते. त्याकरता कापडाला मेण किंवा साबण लावावे. (६) मशीन नेहमी वापरात नसेल तर ते जड जाते. मशीनला वारंवार तेल देऊन ते वापरात ठेवावे. (७) सुई योग्य प्रमाणात व प्रकाराने बसवली नसेल तर ती तुटते. त्यावर उपाय म्हणजे सुई योग्य प्रमाणात व प्रकाराने बसवावी. (८) मशीनचे भाग झिजल्यास यंत्र नीट चालत नाही. म्हणून झिजलेला भाग वेळच्या वेळी बदलावेत. (९) बॅलन्स व्हीलचा स्क्रू ढिला झाला तर यंत्र बंद पडते. त्यावर उपाय म्हणून स्क्रू घट्ट आवळून बसवावा. दोरा व सुई तुटण्याची कारणे : शिवणकाम करताना वरचेवर दोरा व सुई तुटत असते. त्याची कारणे माहीत असणे आवश्यक असते. कारणे : (१) तोल चाक(बॅलन्स व्हील)उलट दिशेने फिरणे. (२)सुई उलटी लागणे वा चपटी बाजू बाहेरून लागणे. (३) सुईच्या वा कापडाच्या मानाने दोरा बारीक असणे. (४) दोरा यंत्राच्या सर्व भागांतून ओवला न जाणे. (५) दोऱ्याचा खालचा दाब कमी राहून वरच्या दोऱ्यावरील दाब अधिक असणे. (६) हलक्या प्रतीच्या सुया वापरणे. (७) शटलची कड धारदार होणे. (८) गुंडीचा/हलक्या दर्जाचा व कमी पिळाचा दोरा वापरा(९) वरचा व खालचा दोरा एकाच प्रतीचा नसणे. (१०) दोरा खेचपट्टीला खाच पाडणे. (११) सुईपट्टीला खाच पाडणे. (१२) दोरा खेचपट्टी व गट्टा यामधील लिंकरोलर झिजला असल्याने दोऱ्यास हिसका बसणे. अशा अनेक कारणांमुळे सुईचा दोरा तुटतो. खालचा दोरा व सुई तुटण्याची कारणे : (१) सुई उलटी बसवणे किंवा चपटी बाजू बाहेर येणे. (२) हलक्या प्रतीचा गाठीचा दोरा वापरणे. (३) निडल क्लॅप घट्ट आवळली गेली नसेल तर काही वेळाने शिवणाच्या वेळी सुई खाली घसरून सुईपट्टीवर आपटून सुई मोडणे. (४) सुई वाजवीपेक्षा खाली बसवणे व शटलवर आपटून मोडणे. (५) वरच्या दोऱ्यावरील ताण वाजवीपेक्षा जास्त असणे व सुईला वाकडी ओढ बसणे. (६) सुई वाकडी असणे. (७) सुई बोथट असणे. (८) शिवताना कापड आपल्या बाजूस ओढले तर सुईची ओढाताण होऊन सुई तुटणे. (९) हलक्या प्रतीची सुई वापरणे. (१०) बॉबिनची डबी व्यवस्थित न बसवल्याने सुई आपटून मोडणे. (११) शटल झिजणे. या सर्व कारणांपैकी एखाद्या कारणामुळे दोरा व सुई तुटू शकते. शिवणयंत्राची निगा - देखभाल : जे शिवणयंत्र वापरात असते, त्याचा पुरेपूर उपयोग करून ते नव्यासारखे कसे राहील, ही काळजी घ्यावी लागते. (१) शिवणयंत्रातील सर्व भाग फडक्याने (सुती) पुसावेत. तसेच चाकाच्या सांध्यांमध्ये सुईपट्टी, वक्रीपट्टी, मुखपट्टी, नालाघोडा यासारख्या भागांमध्ये दोरा, धूळ, वंगण साचलेले असल्यास काढून टाकावे लागते. (२) मशीनचे भाग झिजू नयेत, गंज चढू नये म्हणून तेलछिद्रातून नियमित तेल सोडावे. (३) शिवणयंत्रासाठी 'स्पिंडल ऑईल' किंवा मशिनचे खास तेल मिळते, ते तेल वापरावे. खोबरेल तेल व रॉकेल एकत्र करून वापरणे अयोग्य असते. हिवाळ्यात तेल गोठून यंत्र चालविण्यास जड जाते. ६८