पान:गृह आरोग्य.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खालच्या दोरा वर कसा काढावा. आकृती -१२ आकृती -१३ बॅलन्स व्हीलवरील छोटे सुईत दोरा चाक आकृतीत ओवून झाल्यावर दाखविलेल्या दिशेने फिरवून घट्ट करणे बॉबिनमधील व मग शिवायला सुरुवात करतात.बॅलन्स व्हील आपल्याकडे फिरवून करतात. (१) गट्टा : या भागात यंत्राचे सर्व भाग जोडून बसवलेले असतात. (२) बॉबिन वेंडर : रबराच्या रिंगने जोडलेल्या लहान चक्रास बॉबिन वेंडर असे म्हणतात. (३) कनेक्टिंग रॉड : या रॉडला यंत्राचा खालचा व वरचा भाग जोडलेला असतो. (४) स्विच रेग्युलेटर : शिलाईची टीपलहान-मोठी करता येणारा स्क्रू. (५) स्टूल पिन : दोऱ्याची गुंडी किंवा बडल अडकवण्याची स्टीलची छोटी गोल कांडी. (६) बॅलन्स व्हील : या चक्रामुळे शिवण शिवतेवेळी गती देण्यासाठी मदत होते. (७) प्रेसियर बार व स्क्रू : ही पट्टी खालील भागापासून प्रेसियर स्क्रूपर्यंत बसवलेली असते. या स्क्रूने कापडावरील दाब कमी-जास्त करता येतो. हा स्क्रू खाली केला तर कापडावर जास्त दाब पडतो. वर फिरवला तर दाब कमी पडतो. (८) थ्रेड टेकप लिव्हर (घोडा) : याच्या छिद्रातून दोरा ओढून घेतात. कापड शिवताना खाली-वर होत असतो. याच्यामुळे दोरा सुईपर्यंत येऊ शकतो. (९) प्रेसियर फूट : कापड शिवतेवेळी ते निसटू नये म्हणून घट्ट पकडण्यासाठी या भागाचा उपयोग होतो. (१०) टेन्शन डिस्क व स्क्रू : ही दोन लहान लोखंडी पत्र्याची गोलाकार पट्टी असते. त्यापासून थ्रेड टेकप लिव्हरमधून दोरा पुढे सरकवण्यास मदत होते. टेन्शन डिस्क स्क्रूमुळे दोरा कमी-जास्त करता येतो. (११) दातेरी पट्टी : या पट्टीच्या साहाय्याने कापड शिवताना मागेपुढे करता येते. ही पट्टी योग्यप्रकारे बसली नाही तर कापड पुढे सरकताना दोऱ्याच्या गाठी बसतात. (१२) बॉबिन केस : बॉबिन केसच्या रिंगमध्ये दोरा भरून डबीमध्ये बसवून यंत्राच्या घरात बसवावी. बॉबिन बसवताना सुई वर करावी. कारण बॉबिन केस पडण्याचा संभव असतो. (१३) प्रेसियर फूट नाल : ही नाल स्क्रूच्या साहाय्याने प्रेसियर बारच्या खालील बाजूस बसवलेली असते. ही नाल झिजली तर कापड पुढे-मागे सरकत नाही. (१४) निडल केप व निडल स्क्रू : हे निडल केपच्या खाली सुई बसविण्यासाठी जोडतात. स्क्रूच्या मदतीने सुई बसवता येते किंवा काढता येते. (१५) निडल बारः सुई या बारच्या खाली बसवलेली असते. शिवण बरोबर पडण्यास निडल बार वर-खाली .. .. करता येतो. .. (१६) निडल गार्ड : सुईजवळ एक तार गुंडाळलेली असते. त्याला निडल गार्ड म्हणतात. कपडा शिवताना बोट सुईजवळ जाऊ नये म्हणून याचा उपयोग होतो. (१७) पायपट्टी : ही स्टँडच्या खाली जोडलेली लोखंडी पट्टी असते. त्याच्यावर पायाने दाब देऊन यंत्र सुरू करता येते. या पट्टीने मोठ्या चक्राला गती मिळते. शिवणयंत्राच्या दुरुस्तीविषयीची आवश्यक माहिती : शिवणयंत्रातील बिघाडामुळे ते नीट सुरू होत नाही. त्यासाठी नेहमीच यंत्राची निगा राखावी लागते. ६७