Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० गुन्हेगार जाती. अशा एखाद्या भोळवट खेडवळाला गांठतात. ' हा माल चोरीचा आहे सबब पोलिस तपास संपेपर्यंत तो बाहेर काढू नका, ' असें त्याला सांग- तात. कांहीं दिवसांनीं तो माल वापरू लागतो आणि मग त्याला कळतें कीं, आपण ठकलों. पोलिसकडे तक्रार करण्याचें धैर्य त्याला होत नाहीं, हें सांगणें नकोच. त्याचप्रमाणें चोरीचा माल विकत घेणाऱ्या इसमाला एकांतस्थळी नेऊन टाकणकर त्याला लुबाडतात. भिक्षेच्या मिषानें दिवसां वर टेहळुन ठेविलेलें असतें. मग रात्रीच्या वेळीं गांवांत " दीन दीन " म्हणून ओरडत ते घुसतात, आणि त्या घरावर हल्ला करून घरांतल्या माणसांना ठोकतात. माल काढण्यासाठीं ते भुई खणतात, आणि काड्या- मोड्याचें घर असल्यास त्याला आग लावून चालते होतात, ह्मणजे अर्थात् लोकांचें लक्ष्य आग विझविण्याकडे लागतें. ते चोरलेलीं कणसें लागलींच कुटतात, आणि तें धान्य दुसऱ्या चोरलेल्या धान्यांत मिस- ळतात, ह्मणजे तें ओळखण्याची पंचाईत पडते. खळ्यावर किंवा पेवांत चोरी करतांना राखणदार आडवा आला तर त्याला ते बेलाशक सुरीनें भोंकतात, किंवा त्याच्या डोक्यावर काठीचा टोला मारतात. दिवसां भीक मागत असतां ते पेवें टेहळून ठेवितात. मालकानें जर सुखानें धान्य दिलें तर बरें, नाहीं तर ते त्याचीं पेवें लुटतात. नेतांना गळून पडलेल्या धान्याच्या योगानें माग लागू नये ह्मणून ते थोडे थोडेच धान्य नेतात. चोरलेलें धान्य ते तळाबाहेर कोठें तरी भरून ठेवितात. घोंगडीला भोंड किंवा बगण्या चिकटलेल्या पोलिसला आढळल्या, तर ते बहुधा गुन्हा कबूल करतात; म्हणून त्यांच्या घोंगड्या तपासाव्या. चोरलेल्या शेळ्यामेंड्या जर लागलींच मारून टाकता आल्या नाहींत, तर त्यांना ते लांब नेऊन ठेवितात. ते गुरे जंगलांत चरत असतांना चोरतात, व त्यांना लांबवर हांकून नेतात, आणि मग त्यांना विकतात. किंवा त्यांच्या मालकापासून पैसे घेऊन ते तीं परत देतात. “तेलवेचे" पारधी खोटें नारायण तेल खालीं लिहिल्याप्रमाणें विकतात. गिऱ्हाईक म्हणालें कीं, तळहाताला चोळून तें हाताच्या पाठीवाटें आलें