पान:गुन्हेगार जाती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारधी. ९१ पाहिजे, तर ते युक्तिप्रयुक्तीनें तेलांत बुडविलेली चिंधी किंवा दोरी गि-हाइकाच्या हाताखालीं टाकतात. अर्थात् तो हात दाबला म्हणजे त्या बोळ्याचें तेल त्याला लागतें. टाकणकरांना अगदीं गुन्हे करतांना पक- डलें तरी ते गुन्हा कबूल करीत नाहींत, व आपलीं आणि आपल्यापासून माल घेणाऱ्यांचीं नांवें सांगत नाहींत. गुन्ह्यांची हत्यारों:- दरोड्याचे वेळीं पारधी लोक गोफण, धोंडे, काठ्या, कुन्हाडी, सुऱ्या, मशाली आपल्याबरोबर नेतात. क्वचित् प्रसंगी त्यांच्याजवळ तलवारी, बंदुका, भालेही असतात. ते किंकरें, कुस ( नांगराचा फाळ ) व खंतिया, केत्तुर किंवा कुतुर्न ( लांकडी दांडीची लोखंडी मेख ) यांनी घरफोडी करतात. चोरीचे मालाची निर्गतिः - टाकणकर आपल्या घरामध्यें माल दडवीत नाहींत. फिरस्ते पारधी जमिनीला जेथें लहान भेग असेल तेथें ती खोदून तळाशी मोठी खांच तयार करतात, आणि तिच्यांत धान्य घालून तोंड बंद करतात, व त्यावर बहुधा कोणीतरी निजतो. ते कधीं कधीं चोरीचा माल आपल्या तळाजवळ शेतांत किंवा नदीच्या पात्रांत किंवा जनावरें बांधली असतील तेथें अगर तळामागें पुरून ठेवितात. मौल्यवान् चोरीचा माल ते गुन्हा केल्यावर पुष्कळ दिवसांनीं विकतात, शेळ्या मेंढ्या लागलींच मारून खातात, आणि कातडें गांवच्या चांभारांना किंवा ढोरांना अगर दूरच्या बाजारांत नेऊन विकतात. सोनार, कलाल, शेत- करी, पाटील, कुळकर्णी, सावकार त्यांच्यापासून चोरीचा माल विकत घेतात. चोरीचें नाणें ते गोदडींत शिवतात. मुक्काम हलविला म्हणजे एक इसम चोरीचा माल घेऊन मैल दोन मैल तांड्याच्यापुढे जातो किंवा मागें राहतो. अगर चोरीचा माल मागच्या तळावर ठेवून तांडा पुढे जातो आणि मग मागाहून येऊन तो माल ते घेऊन जातात. त्यांच्या बायका चोरीचा माल टांगामध्यें किंवा जखम झाली आहे असें दाखवून तंगडीला फडकें गुंडाळून त्याखालीं दडवून ठेवितात. पारधी व त्यांच्या बायका हात-