पान:गुन्हेगार जाती.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारधी. ८९ तात, हरीण, डुकर, ससा, पांखरें ह्यांची पारध करतात, वनस्पतीचीं औषधें करून विकतात, आणि बजरबट्टू व जंगलचा माल विकतात. वेषांतर:- गुन्हा करतांना पारधी कंबर आणि छातीवरून कापड घेऊन त्याची मागें स्थानी बोली बोलतात. बांधतात, धाटे बांधतात गांठ बांधतात; व हिंदु- गुन्हे:- घरफोडी टाकणकरांच्या हाडांत जितकी खिळलेली आहे तितकी फिरत्या पारध्यांच्या नाहीं. शिकार मिळते तोंपर्यंत ते धान्या- च्या व गुरांच्या लहानसान चोऱ्या करतात. तथापि खाण्याला मिळे- नासें झालें किंवा योग्य संधि सांपडली म्हणजे ते दरोडा, जवरीची चोरी, घरफोडी, ठकबाजी, गुरांची, शेळ्यामेंढ्यांची, पेवांतल्या धान्या- ची, कापसाची व उभ्या पिकांची चोरी करतात. ते आपली गुरें रयते- च्या उभ्या पिकांत चारतात. गुन्ह्याचे आवेशांत टाकणकर मारहाण, वेळेला खूनही करतात. गुन्ह्यांची पद्धतिः- पारधी लोक दरोडे व रस्तालूट मोठ्या व्यव- स्थित रीतीनें व क्रूरपणें करतात. कांहीजण जबरीने घरांत घुसून हल्ला करतात, आणि बाकीचे बाहेरून मदत येऊ देत नाहींत. त्यांच्या टोळीत बहुधा दोन ते चार इसम असतात. पण फक्त नवराबायकोनें मिळून चोरीचा धंदा केल्याचेही उदाहरण आहे. त्यांच्या बायका भीक मागतांना बातमी काढतात. शिवाय ते कलालामार्फत अगर हेरामार्फत- ही बातमी काढतात. टांकी लावण्याच्या धंद्यामुळे टाकणकरांना आयती- च घरें धुंडाळण्याला फावतें. गुन्हे करण्याच्या कामी पारधी लोक दुसऱ्या जातीला मिळतात, आणि दुसऱ्या जातीचे लोकही आपल्यांत घेतात. अलीकडे टाकणकर खरे म्हणून खोटे दागिने भोळ्या खेडवळांना विकूं लागले आहेत. ते मुलाम्याचे दागिने घेतात, आणि ज्या गांवांत आपला साथीदार असेल तेथें जातात. त्याचे मध्यस्थीनें थोडक्यांत सोन्याचे दागिने पाहिजेत