पान:गुन्हेगार जाती.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ गुन्हेगार जाती, इंद्रियें तीक्ष्ण असतात. ते कैकाड्याप्रमाणें फार टणक, चपळ, धीट, सोशीक आणि काम करून निघणारे असतात. त्यांच्या गळ्यांत लांक- डाची काळी शिटी अडकविलेली असते, तिच्या वाटें ते चितर पक्ष्यासा- रखा आवाज काढतात. ते तोंडानें हुबेहूब मोर, ससाणा, बदक, कोल्हे, ससे, खोकड ह्यांचा आवाज काढतात. फिरस्ते पारधी आपली बायका- पोरें घेऊन फिरतात. कधीं कधीं त्यांचे तळांत शंभरांवरही माणसें अस- तात. कधीं कधीं ते आपला संसार गाई, म्हशींवर नेतात. पण बहुधा पुरुषांच्या डोक्यांवर पाट्या, वागुरी, फांस आणि बायकांच्या डोक्यांवर पालें असतात. त्यांच्या तळावर घाणेरडे कुत्रे, कोंबड्या, खप्पड जनावरें असल्यामुळे एकंदर जिकडे तिकडे घाण दिसते. पावसाळ्यांत पारध्यां- च्या टोळ्या गांवाजवळ गोळा होतात, आणि हंगाम लागला म्हणजे फुटून फेरीला जातात. चित्तेवाले पारधी लहान वाघ धरून राजेलोकांना विक- तात (म्हणून त्यांना राजपारधी म्हणतात ), किंवा लहान चाकाच्या गाड्यांवर वाघ घालून गांवोगांव फिरवितात. ते बैलांच्या आडून हर- णाला जाळें घालतात, म्हणून त्यांना “ बहेलिया ” म्हणतात. त्यां- च्याजवळ पालें नसतात, ते झाडाखालीं गांवापासून दूर उतरतात. पार- ध्यांच्या वस्तीला पारधवाडा म्हणतात. 66 " भाषाः-ते मिश्र भाषा बोलतात. तिच्यांत गुजराथीचें प्रमाण जास्त असतें. शिवाय ज्या जिल्ह्यांत राहतात, त्याप्रमाणें त्यांना अशुद्ध कानडी व मराठीही येतें. परजातीच्या समोर ते मोठ्यानें हिंदुस्थानींत बोलतात. सांकेतिक शब्द. राज फौजदार खपै मूल ... कॉन्स्टेबल, पळणें. काळू पोलीस अंमलदार वस्सै चोरी. खोनुकु सोनें. उपजीविकेची बाह्य साधने:- पुष्कळ टाकणकर मजुरी, जातीं उकटणें, शेतकाम, जागलकी वगैरे करतात. फिरस्ते पारधी भीक माग-