पान:गुन्हेगार जाती.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारधी. ८७ धारवाडकडे कांहीं मुसलमान पारधीही आढळतात. त्यांच्यांत चित्तेवाले पारधी म्हणून एक जात आहे. वस्तिः- पारधी मुंबई इलाखाभर पसरले आहेत. त्यांची वस्ति खान- देशांत फार आहे. शिवाय ते मध्यप्रांतांत व सिंधप्रांतांत आढळतात. गुन्ह्यांचे क्षेत्र:- टाकणकर घरेदारें करून राहिलेले आहेत. ते गुन्ह्यासाठी जिल्ह्याच्या बाहेर आणि फार दिवस जात नाहींत. बाकीचे सर्व जातीचे पारधी फिरस्ते आहेत. ते तळापासून आठ दहा मैलांच्या- वर गुन्हा करीत नाहींत. खानदेशच्या सरहद्दीवर आणि मध्यप्रांतांत ते क्वचित् पंचवीस ते पन्नास मैल गेल्याची उदाहरणें आहेत. फिरस्ते पारधी शिकारीच्या लागानें पाण्याजवळ आणि गुरें चरणाचे जागेजवळ गवती पालांत राहतात. लोकसंख्या:- ह्यांची लोकसंख्या अजमासें तेरा हजार आहे. स्वरूप :- फिरस्ते पारधी बहुतेक वस्त्रहीन असून घाणेरडे व अव्य- वस्थित रहातात. ते केंस कधीं काढीत नाहींत, व विचरीतही नाहींत. कांहीं बायका लुगडेंचोळी नेसतात, कांहींजणी अपरा घागरा घालतात. पुरुष आणि स्त्रिया गळ्यांत रंगीबेरंगी मण्यांच्या माळा घालतात. बायका हातांत कथील, कापरबास किंवा पितळेच्या बांगड्या, कानबाळ्या व सांखळ्या घालतात. पुरुषही असल्या बाळ्या, कडीं, सांखळ्या घाल- तात. त्यांचे अंगावरचें धोतर काळसर असतें. ते डोक्याला एक चिंधी किंवा पागोटें गुंडाळतात, पण माथा बहुतेक उघडा राहतो. टाकणकर किंवा घरदार करून राहिलेल्या पारध्यांचा पोषाख बहुतेक कुणब्या- प्रप्तार्णे असतो. बायका लुगडेंचोळी नेसतात, आणि कांहीं गुजराथणी- प्रमाणे लहंगा किंवा घागरा नेसून तोंडावरून ओढणी घेतात. पारध्यां- च्या पोटजातींत बेटीव्यवहार नाहीं. टाकणकर आपणांला उच्च जातीचे म्हणवितात. पारधी दारू फार पितात, आणि गोमांस खेरीजकरून सर्व मांस खातात. फिरस्त्या पारध्यांचा रंग काळा, उंची मध्यम, व