________________
मिआने. ८५ पुंडावा माजविला होता. लुटावयाच्या घराची बातमी ते गांवच्या लोकांकडून मिळवितात. त्यांच्या टोळींत बहुधा पांचांवर इसम अस- तात. जेथें गुन्हा करावयाचा तेथून सुमारें दहा मैलांवर जंगलांत, तळीं, विहिरींजवळ ते उतरतात. बंदुका, तलवारी, काठ्या घेऊन ते बेकायदा आणलेल्या अफूसाठीं झाडा घेण्याच्या मिषानें घरांत शिरतात, आणि लोकांना खूप तंबी देतात. दागिन्यांची जागा दाखविली नाहीं तर ते त्यांना सपाटून मार देतात. हें चाललें असतांना टोळींतील इतर लोक वाटा व गांवकूस रोखून धरतात. केव्हां केव्हां मोठा दरोडा घालण्यापूर्वी किंवा गांव लुटण्यापूर्वी एक दोन मिआने येऊन जागा नीट पाहून जातात, किंवा एखादा आसपास कांहीं काम पत्करतो; आणि सर्व बेतवात झाला म्हणजे जेथें मिआन्यांचा तळ (डंग ) असेल तेथें निरोप करतो. अशा वेळीं ते नदीच्या कांठाकांठानें खूप मजल काढतात. रस्तालुटीच्या वेळीं ते टोळीचे दोन भाग करून, दोन्ही- कडून 'येणाऱ्या गाड्या व मुशाफरांना अडविण्यासाठी सुमारें एक मैला- च्या अंतरावर बसतात. परत जातांना ते सकत किंवा दलदलीच्या जमिनीवरून जातात; आणि जिकडे जावयाचें त्याच्या उलट चालत जातात, कीं माग लागूं नये. तसेंच टोळींतल्या कांहीं लोकांना इतर पाठकुळीं घालून नेतात, म्हणजे तितकीं पावलें कमी उठतात, आणि म्हणून किती लोकांची टोळी आहे हे समजत नाहीं. ते रात्रीं चालतात आणि दिवसां मुक्काम करतात, व तळाच्या आसपास झाडांझाडांनी हेर ठेवितात. एखादा प्रवाशी किंवा गांवकरी तळावर चुकून आलाच तर टोळीचा मुक्काम हालेपर्यंत त्याला सोडीत नाहींत; आणि बहुधा त्या बापड्याला झाडाला बांधून ठेवून आपण चालते होतात. मोठी लूट मिळाली किंवा तुरुंगांतून सुटले म्हणजे मिआने मुलतानी पिराला जातात. 'बहुधा गुन्हा कबूल करीत नाहींत; केलाच तर तो वडील माणसांच्या मध्यस्थीनें कबूल करतात.