पान:गुन्हेगार जाती.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ गुन्हेगार जाती. किंवा पोलीस अंमलदार अगर संस्थानचे पलटणींतले लोक आहोंत... अशा वेळीं त्यांचे अंगावर चोरलेले पोषाख, पट्टे, तलवारी असतात. गुन्हे:- मालिया मिआने पक्के लुटारू असतात. बदफैली स्त्रियां- वरून किंवा सरकारविरुद्ध खऱ्या अगर काल्पनिक तक्रारीवरून ते पुंडावा माजवितात. काठेवाडांत त्यांच्यासारखे दरवडेखोर कोणी नाहींत. ते रस्तालूट, दरोडे, गांवें लुटणें, गुरें चोरणें, घरफोडी, चोरी, लहानसान जमीनदारांना दहशत घालून पैसे अगर धान्य उकळणें, परजातीच्या मिआन्यांच्या बायकामुली पळविणें वगैरे गुन्हे करतात. ते जारिणी स्त्रियांचीं नाकें कापतात. ज्यांचा त्यांना जांच असतो अशा पोलीस अंमलदारांना ते गांठ्न त्यांचीं नाकें, ओंठ कापतात. ते तुरुंगांतून आणि पोलिसच्या पाहऱ्यांतून निसटून जाण्याच्या कामांत फार पटाईत अस- तात. ते पुष्कळ हत्यारें व दारूगोळा जवळ ठेवितात, व हत्यारें चांग- ल्या तऱ्हेने चालवितात. गुन्हे करण्यासंबंधानें त्यांची योजना मोठ्या अकलेची असते, आणि ती योजनाही ते मोठ्या धाडसानें अंमलांत आणतात. जाम, संधवानी, मोर, परेडी, मानेक, गंध, लढाणी ह्या जाती फार गुन्हे करतात गुन्ह्यांची पद्धति:- थोडकेसे धाडशी लोक युक्तिप्रयुक्तीनें दाखला मिळवून तलवार, बंदूक घेऊन उंटावर स्वार होऊन गांव सोडतात, आणि एखाद्या वाण्याला अडवितात, ढोरवाड्यावर छापा घालतात, किंवा सावकाराला लुटतात. त्याच्या रखवालदार अरबांनीं किंवा पठाणांनीं उलट हल्ला करून जबर दुखापत केली तरी ते आपल्या जायबंदी सोब- त्याला उजाडण्याच्या आंत गांवांत नेऊन सोडतात; आणि पोलिसला सांगतात कीं सदर इसम झाडावरून पडला किंवा त्याला बैलाने मारलें. गुन्हा पुरता अंगीं लागला म्हणजे ते फरारी ( बारवाटीये ) बनतात, आणि लोकांना पुरे पुरे करून सोडतात. थोड्या वर्षांपूर्वी मिआने आणि कोळी ह्यांची एक टोळी बनून तिनें अहमदाबाद, बडोद्याकडे बराच