पान:गुन्हेगार जाती.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिआने. ८३ पुरुष तंग विजारी, अंगरखा, पसबंडी, आणि मोरवी पद्धतीचें वाटोळे निरनिराळ्या रंगांचें पागोटें घालतात. टिऱ्याभोंवतीं खाकी किंवा काळ्या रंगाचा कपडा बांधून त्याचे पदर ते विजारीवरून सोडतात, त्याला “ पिचोडी " ह्मणतात. ते कधीं कधीं तांबडी किंवा खाकी टोपी किंवा हातरुमाल पागोट्याचे आंतून घालतात, व खांद्यावर उपरणेंही घेतात. कच्छी मिआने पागोट्याचा एक पदर मोकळा सोडतात. मिआ- न्यांची राहणी रजपुतांप्रमाणें असते. त्यांचा स्वभाव आनंदी असून ते फार मस्करीबाज असतात. ते कराराप्रमाणें कधींच चालत नाहींत. ब्रिटिश मुलुखांत त्यांनी गांवांत राहिलेच पाहिजे, असें ठरविलें गेलें आहे. कांहींना आपल्या शेतांत, गंवती छपरांत ( त्यांना बंढ असें ह्मणतात ) राहू देतात. " भाषा:- मिआने आपापसांत कच्छी आणि सिंधीपासून झालेली मिश्र भाषा बोलतात. तिला " करो काजडी ” किंवा “ कुरो कुरो म्हणतात. त्यांना हिंदुस्थानी व गुजराथी बोलतां येतें. “ मेचिओ " म्हणजे मी म्हणतों हीं पालुपदें बोलण्यांत वारंवार आली म्हणजे बोलणारा मिआना आहे असें समजावें. मालीये मिआन्यांचें बोलणें उद्घट असतें. ते रागावले म्हणजे ध्या " " गडाडीया " अशी शिवी देतात. (6 उपजीविकेची दर्शनीं साधनें :- कांहींजण इमानेइतबारें शेती करतात. पण बहुतेक निरुद्योगी असतात; आणि कधीं मजुरी, कधीं शिकार, कधीं गुरखेपणा, यावर कसेबसें पोट भरतात. क्वचित् प्रसंगी त्यांना रामोशी म्हणून अगर वाणी लोक मुशाफरींत रखवालदार म्हणून नोकरीस ठेवितात. थोडेसे पोलिसांत नोकर आहेत. परठिकाणीं ते गाडीवाल्याचा किंवा मजुराचा धंदा करतात. वेषांतर:- ते बहुधा आपणाला सिंधी किंवा जाट व कधीं कधीं गिरासिये अगर फकीर म्हणवितात. मोटा दरोडा मारतांना किंवा गुज- राथत सडकेवर मुशाफरांना अडवितांना ते सांगतात कीं, आपण कस्टम