पान:गुन्हेगार जाती.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिआने. संज्ञा:- उत्तरहिंदुस्थानांतील घरफोडे मिने व मिआने हे एक नव्हत. मिआन्यांच्या पोटजाती खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत:- जाम, संधवानी, मोर, परेडी, मानेक, गंध, लढाणी, सुमेज, सैंतानी, बैदानी, खटिआ अथवा कटिया, भटी, सखाय, मालानी, झेड, सुमेर, वाघेर, काजर- दिये, मुल्ला, जमनी, मालेक, सम आणि धर. वस्तिः- त्यांचे वसतिस्थान काठेवाड आणि कच्छ होय. ते काठे- वाडांत मालिया संस्थानांत, जामनगर संस्थानच्या किनाऱ्याच्या बाजूच्या मालिया, काजर्दा, चिकली, नवागांव येथें राहतात. धंदुका तालुक्यांत पालनपूर आणि पटीपिपलिया येथेंही ते आहेत. कधीं कधीं सिंधमध्यें ते जातात. गुन्ह्यांचे क्षेत्र:- पिकें उलगडल्यावर ते सिंध, कच्छ, राधनपूर, पालनपूर व अहमदाबादेकडे जातात, आणि सर्व काठेवाडभर फिरतात. मुलतान येथें एक पीर आहे. चोरी केल्यावर पाठलाग चालू झाला म्हणजे मिआने मुलतानला जातात. ते रात्रींतून चाळीस ते साठ मैल चोरी करून उजाडण्यापूर्वी घरी येतात. ते फिरस्ते नाहींत. लोकसंख्याः- त्यांची लोकसंख्या सुमारें साडेदहा हजार आहे. स्वरूपः - मिआने मूळचे हिंदू होते. पण ते पुष्कळ दिवसांपूर्वी मुसल-- मान झाले. ते सिंधी लोकांप्रमाणे दिसतात. ही जात सरासरीपेक्षां अधिक उंच, जोमदार व सुस्वरूप आहे. त्यांचे अवयव उसकदार, कें लांब सडक, डोळे पाणीदार, दांत शुभ्र, दाढी खाशी पुंजकेदार व वर्ण काळसर असतो. त्यांना घोड्यावर बसण्याचा व शिकारीचा शोक असतो; आणि ते धूर्त, चपळ, श्रमसहिष्णु, धीट पण क्रूर व विश्वास- घातकी असतात. त्यांच्या बायका सुस्वरूप आणि बदफैली असतात.