पान:गुन्हेगार जाती.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांग गारोडी. ८१ बत्ता ) बरोबर नेतात. त्यांच्याजवळ कुचला, धोतराही असतो. त्याची भूल देऊन ते गुन्हे करीत असावेत. चोरीच्या मालाची निर्गतिः -मांग गारोडी जवाहीर, रोकड आणि कपडे पुरुषबायकांच्या अंगावर किंवा म्हशीच्या गोण्यांत वागवितात. झाडा घेतांना पुरुषांचें गुदद्वार आणि बायकांचें मायांग तपासावें. तसेंच चोरीचा माल ते आपल्या तळाच्या आसपास किंवा जनावरें बांधतात त्या ठिकाणीं पुरून ठेवितात. ते चोरीचा माल कलालांना विकतात. चोरलेलें धान्य तळानजिकच्या कडब्याच्या गंजीखाली लपवून ठेवितात; अगर सामलतींतल्या कुणब्याजवळ किंवा पाटलाजवळ ठेवितात; किंवा चोरल्या ठिकाणाहून दूर नेऊन ताबडतोब विकतात. थोडकेंसें धान्य बायका आपल्या कमरेला बांधलेल्या कपड्यांत लपवितात, म्हणून गरोदर दिसणाऱ्या बायकांचा झाडा घेत जावा. मौल्यवान् चोरीचा माल ते शेजारच्या जिल्ह्यांत अगर प्रांतांत असलेल्या स्वजातीच्या टोळीच्या स्वाधीन करतात. लोहार, पाटीलही त्यांना तो विकण्याचे कामी मदत करतात. त्यांच्या बायका फार उत्तम हेर असतात. एखाद्या तांड्यांत जर पोलीस आले तर पुरुष लगेच वर्दळीला येतात, आणि बायका एकच आरडाओरड करून सोडतात. वेळ पड- ल्यास त्या स्वत:ला आणि आपल्या पोरांना दुखापत करून घेतात, आणि पोलिसांवर भलभलते आळ घालतात; पोराची तंगडी धरून त्याला गरगर फिरवितात, आणि पोलिसला म्हणतात निघून जा, नाहीं तर मी पोर आपटतें. पोलिसनें लाजून निघून जावें म्हणून त्या कधीं कधीं लुगडें सपशेल वर करतात, किंवा नागव्या होतात. झाड्यांत जर चोरीचा माल निघाला तर पुरुषाला वांचविण्यासाठी बायका आपल्या अंगावर गुन्हा घेतात. बायकांनी चोरलेला माल तिच्याच कुटुंबांत ठेवितात. चोरीचें कापड ते कलालाला देऊन दारू विकत घेतात, किंवा गोण्यांत अगर गोदड्यांत शिवून संधि पाहून विकातत. ६