पान:गुन्हेगार जाती.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० गुन्हेगार जाती. शिंगें कापून त्यांचें रूप असें बेमालूम बदलतात कीं धन्याला ती ओळ- खतां येत नाहींत. चोरीचा माल घेणाराला ते आडरस्त्याच्या जागीं चोलावितात, आणि तेथें त्याचे पैसे लुबाडतात. ते मेंढवाड्यांतून शेळ्या, मेंढ्या लांबवितात; किंवा कळपांतून एकीकडे चरत असलेलें बकरूं किंवा मेंढरू ते न्याहाळून ठेवितात, व मेंढक्यानें पाठ फिरविली कीं हलकेंच पकडून त्याची झपाट्यासरशी मुंडी मुरगाळतात, आणि त्याला झुडुपांत, किंवा खांचेंत टाकून तेथून निसटतात. मेंढक्या दृष्टीआड झाला ह्मणजे ते तेथें परत येऊन त्याला तळावर घेऊन जातात. तेथें त्याच्या शिंगें, कातड्याची व्यवस्था वगैरे लागलींच लावून टाकतात. भीक मागतांना किंवा तमाशा करतांना त्यांचे सर्व लक्ष एखादी शिकार हुडकण्याकडे असतें. भिक्षेच्या मिषानें त्यांच्या बायका घरें व त्यांच्या वाटा वगैरे पाहून ठेवून पुरुषांना खबर देतात. जवळ किंवा आंत कोणी नसलें तर त्या बेला- शक घरांत जाऊन हातीं लागेल तें उचलतात. चौधी पांचजणी मिळून त्या आसपासच्या बाजारांत भीक मागण्याला व चोरी करण्याला जातात. बाजारांत कोणी गांठोडें खालीं ठेविलें म्हणजे त्यावर त्या नजर ठेवितात. मालकाचें लक्ष्य दुसरीकडे गेलें म्हणजे तें गांठोडे व मालक यांच्यामध्ये त्या उभ्या राहतात, आणि लागलींच त्या तें आपल्या पाटीत घालून हलकेच निसटतात. त्यांच्या पाटीत बहुधा चिंध्या असतात. कोणी पहात आहे असे त्यांना वाटलें, तर त्या पहिल्यानें गांठोड्यावर चिंध्या पसरतात, आणि मग ते उचलतात. गुन्ह्यांत एखाद्या मांग- गारोड्याला पकडलें तर टोळींतले इतर लोक तो आपल्यांतला आहे' असे कबूल करीत नाहींत, आणि मी अमक्या टोळींतला आहे असें तोही कबूल करीत नाहीं. चांगली कमाई झाली तर ते देवीचा गोंधळ घालतात. गुन्ह्यांची उपकरणे:- काठ्या आणि गोफणी हीं त्यांची मुख्य हत्यारे हात. घरफोडीसाठीं ते कधीं कधीं कुन्हाड, खंटोडा ( लोखंडी :