पान:गुन्हेगार जाती.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांग गारोडी. ७९ वगैरेंवर मांगगारोडी पोट भरतात. गवळ्यांजवळून भाकड म्हशी घेऊन त्या गाभण झाल्या म्हणजे ते त्यांना दुप्पट किंमतीला परत विकतात. त्यांच्या बायका व्यभिचारी असतात. त्या गाणें गाऊन भीक मागतात, आणि गवत, सरपण विकतात. वेषांतर:- गुन्हे करतांना ते धाटे बांधतात व आपलीं नांवें वरचेवर बदलतात. गुन्हे :- बायकापुरुषांसुद्धां सर्वांना चालतां येऊ लागल्यापासून चोरी- चा अभ्यास असतो. पुरुष रात्रीं गुन्हे करतात. हंगामाच्या दिवसांत विशेषंकरून ते धान्य व कापूस चोरतात, आणि उभ्या पिकांत आपली जनावरें चारतात. ते कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, ढोरें विशेषतः म्हशी चोरतात, व गुरांना विषही घालतात. त्यांच्या तळावर जाण्यास गांवकरी धजत नाहीं. कधीं कधीं ते घरफोडी, दरोडे, रस्तालूट वगैरे करतात. अलीकडे ते रेल्वेवर चोऱ्या करूं लागले आहेत. थोडासा विसार देऊन भाकड म्हशी फळविण्याचा बहाणा करून ते त्यांना दूर- च्या बाजारांत नेऊन विकतात. खरे ह्मणून खोटे दागिनेही ते विकतात. त्यांच्या बायका दिवसां चोऱ्या करतात. बाजारांत खिसे कातरणं, वाळत घातलेली कापडे, जोडे, कोंबड्या वगैरे हलकेच चोरणे ह्यांत त्यांच्या बायका फरि पटाईत असतात. गुन्ह्यांची पद्धतिः - त्यांचा तांडा फार मोठा असतो. कधीं कधीं त्यांत ऐंशी, शंभर माणसेही असतात. तळावर बहुधा मुलें व तान्ह्या मुलांच्या आया राहतात. पण विचारलें असतां त्या चक्क सांगतात कीं आम्हांला कोणी पुरुष नाहींत. ते आसपासचीं शेतें लुटतात. रस्ता- लुटीच्या वेळी ते लहान लहान टोळ्या करून मैल दोन मैल रस्ता रोखून धरतात, आणि जसजशा गाड्या, वाटसरू येतात तसे ते त्यांना लुटतात. म्हशी चरण्याला सोडल्या असतां ते त्या लांबवितात, गांवचीं गुरे आपल्या गुरांबरोबर हांकन नेतात, आणि त्यांना डागून व त्यांची