पान:गुन्हेगार जाती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांग गारोडी. संज्ञा :- यांची जात मागापेक्षां हलकी असते. त्यांचा व मांगांचा हुकापाणी होत नाहीं. त्यांच्या बायकांना कोंकण व महाराष्ट्रांत काथ-- कडणी ह्मणतात. वस्तिः- हे फिरस्ते आहेत, व मुंबई इलाखा, मध्यप्रांत, व-हाड आणि निजामशाही ह्यांमध्ये दृष्टीस पडतात. गुन्ह्यांचें क्षेत्र :- त्यांच्या टोळ्या निरनिराळ्या राहाळांत तेवढ्याच्या तेवढ्यांत भटकतात. ते आपल्या तळाच्या आसपास गुन्हे करतात. पण लागाची बातमी लागली तर रात्रींतून गुन्हा करून वीस मैल जातात. एकदां एक मांग गारोडी तळापासून चाळीस मैल खिसे कात- रण्याला गेला होता. लोकसंख्याः- खानेसुमारींत त्यांची निराळी गणती झाली नाहीं. स्वरूपः - पुरुष मध्यम उंचीचे, सशक्त, चपळ, टणक, आळशी आणि कामकंटाळे असतात. ते पंचा किंवा लंगोटी लावितात, बंडी अगर अंगरखा घालतात, कमरेला काचा बांधतात, कसेंबसें जुनें पागोटें डोक्याला गुंडाळतात, आणि खांद्यावर उपरणे घेतात. ऐपतदार असतील ते जोडे घालतात. बायका अपरें व भोंगळ लुगडें आणि चोळी नेसतात. जुन्या कापडाची झोळी मांग गारोडणींचे खांद्यावर लटकते, तिच्यांत जें सांपडेल तें त्या कोंबतात. त्या पोत घालतात आणि लग्नांत किंवा सणा- वाराच्या दिवशीं कुंकूं लावितात. मुले कधीं कधीं गळ्यांत पितळेचे किंवा रंगीत सुती गोफ घालतात. पुरुष आणि बायका यांचे केंस बिन- विंचरलेले व पिंजारलेले दिसतात. ते गलिच्छ आणि भांडखोर असतात. पोलिस पोस्टाचीं गाँवें टाळून ते बाजारच्या अगर मोठ्या गांवाच्या टप्प्यांत गवती पालांतून उतरतात. ते आपला संसार भाकड म्हशींवर नेतात..