________________
७६ गुन्हेगार जाती. लोक घेतात. गुन्हा कबूल केला तरी ते चोरीचा सर्व माल काढून देत नाहींत. ते येणेंप्रमाणें ' बोथिंगा ' देतात - चोरीचा माल घेणाराशीं सौदा चालला असतांना टोळीतील एक इसम पोलिसच्या वेषाने येतो, त्यासरसें मांग दागिने आणि पैसे घेऊन एका बाजूनें पळतात आणि माल घेणारा दुसन्या बाजूनें पळतो. किंवा माल घेणारा इसम दागिन्यांसह घरीं चालला असतां पोलिसच्या वेषाने एकजण त्याला वाटेंत अडवितो आणि त्याचे दागिने हिसकावून घेतो. गुन्ह्यांची उपकरणे:- त्यांचें घरफोडीचें हत्यार " खनतोडा " होय. तो फूटभर लांबीचा लोखंडी बत्ता असून त्याचे टोकाला टाकीसारखें असतें. दरोडा घालतांना ते गोफण, धोंडे, काठ्या, मशाली, कुन्हाड, सुन्य, कट्यारी, मिळाल्यास तलवारी, बंदुका, आणि आपटबार बरोबर नेतात. त्यांची लाठी खांद्याइतकी लांब असते. असें ह्मणतात कीं, मांग जाड बाजूनें लाठी धरतात आणि रामोशी बारीक बाजूनें धरतात. संशय येऊं नये ह्मणून ते घरून काठ्या न नेतां रस्त्यानें गोळा करतात. चोरीच्या मालाची निर्गतिः- लुटीमध्यें रोकड मिळाली तर टोळीतील इसमांना एक व सरनाइकाला दोन हिस्से मिळतात. कांहीं टोळ्यांमध्ये गुन्ह्यांत जे नाईक स्वतः मिळवितो, त्यावर त्याचीच -मालकी असते; आणि शिवाय टोळीच्या कमाईतही त्याचा वांटा असतो. नवशिक्यांना बहुधा रोकड देतात. कारण पोलिसनें पकडलें असतां ते चोरीचा माल काढून देतील किंवा त्याची त्यांना बरोबर व्यवस्था लावितां येणार नाहीं, अशी त्यांना भीति वाटते. ते चोरीचा माल पुरून ठेवितात, आणि पोलिसचा तपास मंदावला म्हणजे तो तसाच सोनार, सावकार, कलाल, बांगडीकासार किंवा आपले आप्तांच्या गांव- कऱ्यांना विकतात.