पान:गुन्हेगार जाती.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांग. ७५ आडरस्त्यांनीं जातात. संकेतस्थानीं किंवा गुन्ह्याच्या ठिकाणापासून दोन तीन मैलांवर नाईक टोळींतील लोक गोळा करतो आणि कमाईची वांटणी करतो. वांटणीच्या वेळीं आपसांतील बेइमानामुळें व गैरविश्वासामुळे बहुधा तंटेबखेडे होतात. मांग एका वेळेला तीन तीन घरेंही लुटतात. चार ते दहांची टोळी करून ते गाड्या किंवा तांगे सूर्यास्ताच्या सुमारास लुटतात. त्यांच्याजवळ काळ्या-कुन्हाडी असतात. टोळींतील दोन इसम रस्त्यावर पानसुपारी खात बसतात, आणि बाकीचे जवळपास दडून राहतात. गाडी किंवा तांगा आला ह्मणजे ते एकदम उडी मारून घोडे अगर बैल थांबवितात; आणि बाकीचे आपल्या दडण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडतात, हांकणाराला खालीं ओढतात आणि वाटसरूंना लुटतात. कधीं कधीं वाटसरूंना झाडाला किंवा गाडीला बांधून ते चालते होतात. हे सर्व कृत्य इतक्या झपाट्याने उरकतात कीं मुशाफराच्या लक्षांत गुन्हेगार रहात नाहींत. मांग घरफोडींत फार पटाईत आहेत. ते बहुधा “ बगली ” पद्धतीने घरफोडी करतात. एक किंवा दोघेजण घरांत शिरतात आणि बाकीचे बाहेर पाळत करतात. ते धाब्याला धारें अशा शिताफीनें पाडतात की उकरलेली माती एके बाजूला सारून आंत पडूं देत नाहींत. त्यामुळे आंतलीं माणसें जागीं होत नाहींत. घरांत शिरल्यावर तेथें दिवा सांपडला तर ते लावितात; निजलेल्या इसमांपैकी कोणाचें पांघरूण एकीकडे सरलें असल्यास ते त्याच्या तोंडावर घालतात. आंतील इसम जें देतील तें बाहेरचे इसम 'चलाखीनें घेतात, आणि आंतल्या इसमांना दग्याची इशारत वेळेवर देतात. कांहीं मांगांमध्ये अशी चाल आहे कीं, बाहेरचा इसम चुटकी वाजवीत राहतो. चुटकी बंद पडली म्हणजे धोका आहे असें समजावें. मांग बहुधा दिवसां किंवा त्यांच्या कुळधर्माच्या दिवशीं चोरी करीत नाहींत. ते आपल्या टोळींत महार, लिंगाईत, जंगम वगैरे इतर जातींचे