Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ गुन्हेगार जाती. त्याच्या आसपास कोणाला न दिसेल अशा ठिकाणी टोळी नेमल्यावेळीं जमते. तेथें जोड़े आणि फाजील कपडे एका इसमाच्या ताब्यांत देतात. आणि ज्या घरावर छापा घालावयाचा, त्याच्या आसपास ढीग घालून ठेवण्यासाठीं पुष्कळसे दगड घेऊन जातात. गोफणीचा नेम मारण्यांत मांग फार तरबेज असतात, आणि कोणी अंगावर आले किंवा पाठलाग केला तर ते गोफण चालवितात. त्यांची घरावर दरोडा घालण्याची रीत दोन प्रकारची आहे:- दरोडखोर मशाली घेऊन बंदुकीचे बार किंवा आपटबार काढीत धोंडे फेंकीत व आरोळ्या ठोकीत गांवांत घुसतात, आणि घराबाहेर येऊ नका असें लोकांना बजावितात. किंवा चोरपावलानें दरोड्याचे घराकडे जातात. तेथें कांहीं थाप मारून घरांत जाण्याचा प्रयत्न टोळीतील एखादा इसम करतो. त्याचें न जुळलें तर कुन्हाडीनें दार फोडतात, किंवा वाशावरून अगर शिर्डीनें भिंती चढून आंत जातात. टोळीतील कांहीजण घरांत शिरतात आणि बाकीचे वाटा रोखतात. आत शिरल्यावर मशाली पेटवितात. घरच्या लोकांना माराची दहशत घालून कोठें पैसे जवाहीर आहे तें दाखवावयाला लावितात. संशय टाळण्यासाठी ते आपापसांत कधीं कधीं कैकाडी किंवा हिंदुस्थानी शब्द बोलतात. पाठलाग करणाऱ्यांच्या हातून सुटण्यासाठीं मांग वाटेल तें घोर कृत्य करतात. माल काढून दिला नाहीं तर ते मारपीट करतात. ते विनाकारण कोणाचे अंगावर हात टाकीत नाहीत. बायकांच्या कानानाकांतला दागिना सहज काढतां आला नाहीं, तर तो ते हिसकून घेतात, मग कान तुटो किंवा नाक तुटो जो तो आपलें काम बरोबर करतो किंवा नाहीं याजवर सरनाइकाची देखरेख असते. काम झाले म्हणजे सरनाईक “चालो """पेड” “निबला" झणतो. त्यासरसें टोळीतील लोक व्यवस्थित रीतीनें मागें फिरतात. आणि कोणी आड येऊ नये म्हणून गोफण चालवितात. नंतर ते . कपडे जोडे ठेविले असतात त्या संकेतस्थानीं जातात. तपास लागूं नये म्हणून ते इतर जातींच्या विशिष्ट जिनसा रस्त्यानें टाकून देतात, आणि