पान:गुन्हेगार जाती.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मांग. ७३ खरे म्हणून खोटे दागिने विकून ठकबाजी करणें वगैरे गुन्हे करतात. रात्री चोरी व घरफोडी करण्यांत ते पटाईत असतात. ते चोरीचा माल घेणाराला जंगलांत एकांतठिकाणी नेऊन लुटतात, किंवा ' बोथिंगा' (थाप) देऊन त्याचे पैसे लुबाडतात. सातारा जिल्ह्यांतले “ भिसी ” व “ सोनवले " अट्टल चोर आहेत. कर्नाटकांतले मादर लहानसान चोऱ्या करतात आणि गुरांना विष घालतात. हक्कावरून शेतकऱ्याचें व त्यांचें वांकडें आलें ह्मणजे किंवा दुष्काळ पडला आणि कातड्याला भाव आला ह्मणजे ते जनावरें मारतात. महाराष्ट्रांत हक्कवहिवाटीसंबंधानें महारमांगांचे नेहमीं तंटे व मारामाऱ्या होतात. दरोडेखोर मांगांबरोबर त्यांच्या बायका कचित् स्वयंपाकपाणी करण्याला जातात. गुन्ह्यांची पद्धतिः- मांगांचा धंदा दोरखंड, केरसुण्या विकण्याचा असल्यामुळे लुटण्याजोगें घर त्यांना आगाऊ पाहून ठेवतां येतें. ज्या गांवीं गुन्हा करावयाचा तेथल्या मांगांमार्फत किंवा वहिमी लोकांमार्फत किंवा ज्याचें घर लुटावयाचें त्याच्या वैऱ्यामार्फत त्यांना बातमी लागते. अशा प्रसंगी बातमी देणाराला कमाईचा वांटा मिळतो. सणानिमित्त किंवा कार्यानिमित्त लोक चीजवस्त अंगावर घालतात. तेव्हांही ते संधि साधतात. सरनाईक दहा ते विसांची टोळी करून दरोडा घालतो. जो चौर्यंत अट्टल, बोलण्यात हुशार, अकलेचा पुरा, व चारचौघांना घेऊन चालणारा असा असून ज्याचें जमीनदारांपाशीं व गांवकामगारांपाशीं वजन असतें अशाला टोळीतले लोक नाईक निवडतात. गुन्ह्यासंबंधानें कोणी काय काय करा- वयाचें हें सर्व तो साधकबाधक गोष्टींचा विचार करून मुकर करतो. ह्या मसलतीच्या बैठकींत ते रगड दारू झोंकतात. नाईक टोळीबरोबर गुन्ह्याला जातो किंवा दुसरा इसम नेमून देतो. तो बरोबर गेला तर त्याला एक वांटा जास्त मिळतो, न गेला तरी त्याचा वांटा त्याला मिळतो. ठाम बेत झाल्यावर ते बहुधा अंधाऱ्या रात्री गुन्हा करतात. जेथें गुन्हा करावयाचा