पान:गुन्हेगार जाती.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९ मांग. - काटोर गरगर फिरवून मारलें असतां सुमारें पन्नास यार्ड जातें आणि चांगलें बसलें तर तंगडीच मोडतें. तीरकमठा, तलवारी, किल्ल्यांचा जुडगा, काड्याची पेटी, मेणबत्तीचा तुकडा हीं कधीं कधीं त्यांच्या- जवळ असतात. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते शेतांत, उकिर- ड्यांत, गवताच्या गंजीखालीं, झाडांच्या ढोलींत, विहिरीच्या किंवा डो- हाच्या पाण्याखालीं छपवून ठेवितात. कधीं कधीं ते तो आपल्या घरांत 'चुलीखालीं, माळ्यांत, पोकळ बांबूंत, गोठ्यांत, बिळांत, अगळीच्या भोंकांत ठेवितात. तपास मंदावला ह्मणजे माल गाळून सोनार, पाटीदार, गिरासे, वाणी, बोहरी, मेमन, लोहार यांच्या मार्फत विकतात. असा संशय आहे कीं, गांवकामगारांचाही त्यांत वांटा असतो. चोरीचें कापड ते गांवच्या वाण्याला विकतात, किंवा तें गोदडींत शिवून टाकतात; नाहीं तर तें जाळून टाकतात आणि जळालेले कांठ देऊन टाकतात. चोरलेली जनावरें लांब एका बाजूला ठेवितात, आणि मालकानें स्वतः किंवा आडत्यामार्फत निमीशिमी किंमत दिली ह्मणजे संकेतस्थानीं जनावरें आणून सोडतात. याप्रमाणें न झालें तर तीं खाटकांना किंवा लांबच्या बाजारांत नेऊन विकतात. चोरलेल्या शेळ्यामेंढ्या लागलीच खाऊन चट्ट करतात. चोरलेले घोडे आणि उंट सिंध प्रांतांत नेऊन विकतात. संभावित दिसणाऱ्या एखाया पाटीदार, गिरासी किंवा वाणी वगैरेंच्या हातून भारी किंमतीचा चोरीचा माल ते घरीं पोंचता करतात. मांग. संज्ञा :- मांगांना गुजराथेंत “ मांगेला, ” आणि कर्नाटकांत “मादर किंवा मादीगरू " ह्मणतात. त्यांच्या मुख्य पोटजाती खालीं लिहिल्या- प्रमाणें आहेतः– नुडा किंवा खोत्रा, होलड, रखवालदार किंवा घाटोळी, डाकेलवार, पेड्या, मोची.