पान:गुन्हेगार जाती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ गुन्हेगार जाती. शिरतात. तिकडे जर पहारा असला तर पुढच्या बाजूनें थोडेसें पुढें जाऊन गाडी चालूं लागल्यावर ते फळीवर उडतात व दाराबाटें शिरतात, आणि दार लागलें असल्यास पुढच्या डब्यावाटें शिरतात. चालत्या गाडीच्या आवाजांत हें सर्व बिलकुल ऐकू येत नाहीं. काम झाल्यावर गाडी उताराजवळ किंवा स्टेशनाजवळ पोंचून तिचा वेग कमी झाला ह्मणजे ते उतरतात. बफरवर सरपटत जाऊन ते मालगाड्या उभ्या अस- तांना त्यांत शिरतात. गाड्या चालू झाल्या ह्मणजे ते मालाच्या डब्यावर चढून जातात आणि धान्याचीं पोतीं खालीं लोटतात. तीं त्यांचेखालीं उभे ठेविलेले साथीदार उचलून नेतात. खालीं असलेले लोक काड्या उजळून गाडींतल्या साथीदारांना इशारत देतात. कोळी मोठे खुनशी असतात. ज्याचें वाकडें असेल त्याच्या घराला किंवा सुडीला आग लावून ते सूड उगवितात. पाटीदार आणि वाणीलोक कोळ्यांना पैसे देऊन त्यांचेकडून आपले वैऱ्याचे घराला आग लावितात. अफू पिकवि- णाऱ्या संस्थानांच्या सरहद्दीवरचे कोळी चोरून अफू आणतात, व आप- ल्या शेतांत पुरून ठेवून किरकोळीनें विकतात. गुन्हेगार टोळ्यांत एकाच गांवचे लोक नसतात. त्यांत ते निरनिराळ्या गांवचे लोक भरतात. त्यांतला एखादा इसम मेला तर त्याच्या घरावर निंबाची डहाळी टाक- तात. याप्रमाणे त्याच्या कुटुंबाला मरणाची बातमी समजते आणि त्याचे आप्त स्तब्ध राहतात. " गुन्ह्यांची उपकरणेंः- कोळ्यांचं घरफोडीचें मुख्य हत्यार झटलें ह्मणजे “ गणेशीया ” किंवा “ खातरीया " होय. गुन्ह्याचे वेळीं त्यांचे कमरेला म्यानांत मोठा सुरा असतो. त्याला 'चर' ह्मणतात. शिवाय करी- यलीढांग किंवा लाठी ( भरदार काठी ), धारिया ( तीक्ष्ण कोयता लाव- लेला बांबू ), वान्सी ( दांते असलेला विळा लाविला आहे असा बांबू ), काटोर किंवा कातरीया ( तीरकमठ्यासारखें कठिण लांकडाचें कात- ड्यांत मढविलेलें तीन फूट हत्यार ) हींही त्यांच्याजवळ असतात