पान:गुन्हेगार जाती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० गुन्हेगार जाती. वस्तिः- महाराष्ट्रांत व दक्षिण महाराष्ट्रांत त्यांची वस्ति गांवोगांव आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथें त्यांचा उपसर्ग फार आहे. गुन्ह्यांचे क्षेत्रः- ते बहुधा आपल्या गांवच्या आसपास गुन्हे करीत नाहींत. पण गांवापासून सुमारें तीस मैलांच्या आत बाहेर परजिल्ह्यांत किंवा तालुक्यांत ते गुन्हे करतात. एकदां सोलापूरच्या मांगांनी शंभर मैलांवर कोल्हापुराकडे दरोडा मारला. डाकेलवार फिरस्ते आहेत. बाकीचे ठायीं बसे आहेत. लोकसंख्या:- त्यांची लोकसंख्या सुमारें अडीच लाख असून अह- मदनगर, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, विजापूर, धारवाड, बेळगांव, कोल्हापूर वगैरे ठिकाणीं त्यांचा विशेष भरणा आहे. "" स्वरूपः - ते खुनशी, क्रूर, तापट, बेफाम, धट्टेकट्टे, बांधेस्त, तालिम- वाज व चपळ असतात. त्यांचा वर्ण काळा, शरीर रांठ, मुद्रा उग्र आणि राहणें व खाणें घाणेरडें असतें. ते मेलेली जनावरें खातात, व फार दारुबाज, गांजेकस असून तंबाखू ओढतात. मांगवाडा ऊर्फ मादरगेरी गांवाबाहेर महारवाड्यापासून दूर असतो. ते बेलभंडाराची शपथ घेतात व आपल्या जातींत चोरी करीत नाहींत. त्यांच्या जमातीच्या मुख्याला “ देशमेहत्रे " ह्मणतात. आणि गुन्हेगारांच्या मुख्याला “ सरनाईक ह्मणतात. त्यांच्या बायका बुचडा आगोळाशिवाय बांधतात, हातांवर विंचू, साप गोंधतात, आणि बोटावर उभ्या तीन रेधा व एक आडवी व हाताचे पाठीवर सूर्यफुलें गोंधतात. त्यांच्या लुगड्याला कासोटा नसतो, व चोळ्या अपया असतात. त्या अंगावर पितळेचे कथलाचे दागिने घालतात. पुरुषांचें धोतर घाणेरडें आणि पागोट्याच्या चिंध्या असतात. ते पेहरण घालतात आणि अंगावर धोतर घेतात. ते आपाप- सांत हजामत करतात, ह्मणून त्यांची हजामत वाढलेली असते. भाषा:- ते राहतात त्या जिल्ह्याची भाषा बोलतात. त्यांचें बोलणें बहुधा दांडगें येतें.