पान:गुन्हेगार जाती.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुजराथ कोळी. ६७ पालनपुर, राधनपूर, पट्टण येथील कोळ्यांशिवाय इतर कोळी टोळी करून घरांवर दरोडा घालीत नाहींत. गुजराथी कोळी हाडाचेच रस्ता- लूट करणारे आहेत. त्यांची टोळी रस्त्यावर एखाद्या सोईस्कर जागीं दडून बसते. ज्याला लुटावयाचें त्याला मागच्या मुक्कामाला हेरलें असतें. टोळीतला एखादा इसम त्याच्याबरोबर जातो आणि आपल्या सोब- त्यांना शिकार आल्याची इशारत देतो. त्यासरशी टोळी बाहेर पडते. कांहींजण गाडी थांबवून धरतात, तर कांहीं तिची झडती घेतात, आणि वाटसरूंना चोपून त्यांच्या अंगावरची चीजवस्त आणि गाडींतलीं बोचकी व भांडीकुंडी काढून घेतात. कोणी आडवें आलें कीं पार बायका- पोरांसुद्धां जबर दुखापत किंवा खून होईपर्यंत ते ठोकून काढतात. गुरांची चोरी ते येणेंप्रमाणें करितातः- रात्री गोठ्यांत शिरून, मुशाफरांचीं किंवा गाडीवाल्यांची जनावरें मुक्कामाच्या ठिकाणाहून हांकून नेऊन, किंवा हांकणारे पेंगत असतां गाड्या हळू चालतात अशा वेळीं एक बैल सोडून, ते बैल चोरतात. गाडी वांकडी तिकडी चालूं लागल्यावर हांकणारा जागा होतो, आणि मग त्याला बैल गेल्याचे कळतें. कोळ्यांचा विशेष डोळा बैलांवर आणि म्हशींवर असतो. ते कधीं कधीं उंट घोडेही चोर- तात, पण शेळ्या मेंढया फारसे चोरीत नाहींत. पाटणवाडीये शिवाय- करून ते गाई बहुधा चोरीत नाहींत. चोरलेली जनावरें ते लागलींच लांबवर नेतात, आणि मालकांनी हातदात्री केली ह्मणजे तीं त्यांना परत देतात. काठ्या आणि दुसरीं हत्यारें घेऊन पिकांची चोरी ते बहुधा रात्री करतात. राखणदाराने ओरड केली आणि शेजारच्या शेतांतले लोक मदतीला आले तर ते मोठी मारामारी करतात. खेडा जिल्ह्यांतले कोळी मालगाड्या लुटतात. ते रेल्वेवर नोकर असल्यामुळे मालाची चढ- उतर करणें, गाड्या एका बाजूला नेणें बगैरेंची त्यांना माहिती असते. त्यामुळे चालत्या गाडीवर उडी मारून जाण्यांत व गाडीवरून उडी टाक- यांत ते बडे धीट होतात. प्यासेंजर गाडीचे सामानसुमानाचे डबे ते रात्रीं न्याहाळून ठेवितात, आणि संधि सांपडल्यास मागच्या बाजूनें आंत