पान:गुन्हेगार जाती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ गुन्हेगार जाती. पोलिसच्या तपासासंबंधीं त्यांना बातमी पोंचवितात. ह्मणून कोळी नोक- रावर पोलिसांनीं नजर ठेवावी. अंधेर पडल्यावर व पोलीस गस्तीला निघण्यापूर्वी कोळी घराबाहेर पडतात, आणि पडक्या इमारतींत, किंवा आडरस्त्याच्या देवळामशिदींत, किंवा स्नेह्याचे घरीं संधि सांपडेपर्यंत वेळ घालवितात. रात्र बरीच झाली आणि जिकडे तिकडे सामसूम झालें म्हणजे मग टोळी नवीन तोडलेल्या काठ्या आणि ( खातरीया ) आंक- डीची काठी घेऊन जें घर फोडावयाचें तेथें जातात. कांहींजण पाळतीवर राहतात, आणि कांहीं रुमाली पद्धतीनें मागच्या भिंतीला (पुढची भिंत फोडणें अपशकुनी समजतात. ) धारें पाडतात. आंत भिंतीजवळ कोणी नाहीं अशी खात्री करून घेण्यासाठी आंत काठी घालून ती इकडे तिकडे फिरवि- तात. नंतर एक दोघे किंवा तिघे चौघे धान्यावाटें आंत जातात, आणि माल घेण्यासाठी दोघेजण बाहेर उभे राहतात. आंत गेलेल्या इसमांपैकी कांहीजण घर शोधतात, आणि बाकीचे लाठ्या, सुऱ्या घेऊन निजले - ल्या इसमांवर नजर ठेवितात. कोणी जागें झालें आणि आरडाओरड करितात असे दिसलें, म्हणजे हत्यारे दाखवून आणि मारपिटीची तंबी देऊन ते त्यांना गप्प करतात. अन्न खेरीजकरून जें हातीं पडेल तें ते उचलतात आणि दारावा किंवा खिडकीवारें निघून जातात. माग लागू नये म्हणून गुन्ह्याच्या ठिकाणापर्यंत व तेथून थोडेंसें दूर परत, कोळी लोक चवड्यावर चालत जातात. आपल्या गांवाशेजारच्या गांवीं घरफोडी करणं झाल्यास ते आपले जोडे, फाजील कपडे वगैरे जेथें गुन्हा करावयाचा त्या गांवाबाहेर काढून टोळीपैकी एकाच्या स्वाधीन करतात आणि गुन्हा केल्यावर त्या ठिकाणी परत येऊन कपडे, जोडे घालून परततात. कोळ्यांनी पाडलेले भोंक बरेच मोठें व ओबडधोड असतें. माळा फोडणें, लहान खिडक्यांच्या झडपा फोडणें किंवा काढून टाकणें, माळवदावर किंवा वरच्या मजल्यावर चढून खिडक्यांची दारें विजाग या वरून उचलणे इत्यादि मार्गांनीही ते घरांत शिरतात