पान:गुन्हेगार जाती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुजराथ कोळी. ६५ ओढतात, आणि सुरतेकडे गवंडी काम करतात, मासे धरतात व होड्या हांकतात. कांहीं सरकारी खासगी जागलकी, व गिरणी, रेल्वे, पोलि- सांत नोकरी करतात. त्यांना माग काढण्याचेंही काम मिळतें. कोळ्यां- तील जमीनदारांना ठाकूर म्हणतात. त्यांच्या बायकांना गोषा असतो. वेषांतर:- रजपूत, ठाकूर, बारोट, पाटीदार यांचा वेष ते उत्तम प्रकारें घेतात. ते कधीं कधीं नानकशाही साधु व ब्राह्मणांचा वेष घेतात. पण अडाणीपणामुळे त्याची त्यांना नीट बतावणी करतां येत नाहीं. गुन्ह्यांचे वेळीं ते लंगोटी नेसतात. आणि गुरांच्या केंसांच्या “ भुक्यांनी आपली तोंडें झांकतात. गुन्हे:- ते घरफोडी, चोरी, गुरांची आणि पिकांची चोरी, आग लावणें, मालगाडीवर चोरी, घरावर किंवा रस्त्यावर दरोडा, बी. बी. व सी. आय. आणि आर. एम. रेल्वेच्या मालगाड्यांत चोऱ्या वगैरे गुन्हे करतात. लोकांना दहशत बसण्यासाठी किंवा सूड उगविण्यासाठी ते जबर दुखापत व खूनही करतात. खेडा जिल्ह्यांतील बोरसद व आनंद ताल- क्यांतले पाटनवाडीये कोळी पैसे घेऊन मारेकऱ्याचें काम करतात. अहमदाबाद आणि काठेवाडामधील कोळी पैसे घेऊन चोरलेली जनावरें परत देतात. आणि काठेवाड आणि गुजराथेंतल्या संस्थानांतील कोळी भूल देऊन चोरी करतात. याशिवाय बेकायदेशीर रीतीनें तयार करणें आणि चोरून अफू आणणे हे गुन्हेही कोळी करतात. दारू, मीठ गुन्ह्यांची पद्धतिः - घरफोडीबद्दलची माहिती ते स्थानिक स्नेह्यां- कडून काढतात. पण बहुधा ते दिवसां घरें हेरून ठेवितात. आगाऊ शोध न आणवितां रात्री इकडे तिकडे हिंडून एखाद्या एका बाजूच्या घरावरही कधीं कधीं ते धाड घालतात. कोळी नोकर आपल्या जातभाईंना आपले मालकाचे घराची खबर देतात, आणि ते गुन्हा करून गेल्यावर ५